शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

दुष्काळी गावात मोफत टँकर सुरू

By admin | Updated: March 21, 2017 05:06 IST

प्रशासनाच्या टँकरची वाट न बघता नीरा देवघर धरण भागातील पाणीटंचाईग्रस्त गावांना राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हा परिषद सदस्य

भोर : प्रशासनाच्या टँकरची वाट न बघता नीरा देवघर धरण भागातील पाणीटंचाईग्रस्त गावांना राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांच्या वतीने मोफत पाणी टँकर वाटप सुरू करण्यात आले आहे. नीरा देवघर धरण भागातील महाड-पंढरपूर व रिंगरोडवरील धारांबे, पऱ्हर बु., पऱ्हर खु., निवंगण, कळंबाचा माळ, शिरवली हि.मा., शिळींब, सुईरमाळ, कारुंगण येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या गावांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य रणजित शिवतरे यांनी मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले आहेत. टँकरचे वाटप करण्यात येत असून त्याचा शुभारंभ शिळींब येथे करण्यात आला. या वेळी लक्ष्मण दिघे, धोंडिबा मालुसरे, विलास मादगुडे, शंकर पारठे, रवी पारठे, जिजाबा पारठे, नंदू सोनी, बाळासो धामुणसे, बापू दिघे, संदीप धामुणसे व महिला उपस्थित होत्या. नीरा देवघर धरण भागात दर वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे सदर गावातील ग्रामपंचायती टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे देतात. मात्र हे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर ते उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवले जातात. त्यानंतर पाहणी करुन टँकर मंजुरीला पाठवतात. याला साधरणपणे एक महिन्याचा कालावधी लागत असून, प्रत्यक्षात टेंडर होऊन टँकर सुरु होण्यास विलंब लागत असल्याने नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे शिवतरे यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चाने टँकरने मोफत पाणी वाटप सुरु केले आहे. (वार्ताहर)