शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘अवकाळी’ग्रस्त शेतकरी वाऱ्यावर!

By admin | Updated: April 13, 2015 06:14 IST

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे

बापू बल्ौकर, पुणेगेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे. ती तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आली आहे; मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात ती जमाच झाली नाही. फक्त इंदापूर तालुक्यात १00 टक्के वाटप झाले आहे. जिल्ह्यात जानेवारी वगळता दर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी धास्तावला आहे. दर महिन्यात तो पावसाचा सामना करीत उरलेले पीक कसेबसे वाचविण्याचा प्रयत्न करतो, तोच पुन्हा पाऊस पडत आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ४ हजार २३४ हेक्टरवरील भात व ४५३.२६ हेक्टरवरील द्राक्षपिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर २८ फेबु्रवारी व १ मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ५८ गावांतील १५ हजार ८९२ शेतकऱ्यांचे ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले. ६ हजार ३७५ हेक्टरवरील पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यानंतर आता १0 व ११ एप्रिल असे दोन दिवस पुन्हा जिल्ह्यात अवकाळीने हैदोस घातला आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २0१४ रोजी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी वेल्हा, खेड, आंबेगाव, इंदापूर, बारामती तालुक्यांसाठी चार महिन्यांनंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २ लाख ४४ हजार ९१ लाख ८५0 रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.ही रक्कम ३० मार्च २0१५ रोजी प्रशासनाने तहसीलदारांच्या खात्यात जमाही केली आहे. मात्र, याचे अद्याप या तालुक्यात वाटपच झाले नाही. फक्त इंदापूर तालुक्याने ही रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.वेल्हेचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, हे अनुदान ३१ मार्च रोजी मंजूर झाल्याने तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे नंबर उपलब्ध नसल्याने हे अनुदान लॅप्स करून हेच अनुदान एप्रिल महिन्यात परत येणार आहे. ते आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल, असे सांगितले.खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे म्हणाले, की धनादेश बनविण्याचे काम सुरू असून, ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. ३१ मार्चला अनुदान खात्यात जमा झाल्याने ते परत जाणार नाही. बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण हे वैयक्तिक अडचणींमुळे बाहेर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई वाटपाचे चेक तयार आहेत. मात्र, त्यांच्या सहीमुळे ते खात्यात जमा झाले नसल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. इंदापूरचे तहसीलदार संजय पावार यांनी मात्र आलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. ते म्हणाले, की मार्च २0१४ रोजी अवकाळीने मोठे नुकसान झाले होते. यावेळची भरपाई वाटप करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांची बँक खाती घेतली होती. ती आमच्याकडे असल्याने ही रक्कम लगेच त्यांच्या खात्यात वर्ग केली आहे.