शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू शेती अभियानाचे अनुदान मिळाले

By admin | Updated: April 6, 2016 01:32 IST

शासनाच्या कोरडवाहू शेती अभियानातील सहभागी पुणे जिल्ह्यातील १३ गावांपैकी १२ गावांचे रखडलेले अनुदान उपलब्ध झाले असून, ते लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.

बी़ एम़ काळे,  जेजुरीशासनाच्या कोरडवाहू शेती अभियानातील सहभागी पुणे जिल्ह्यातील १३ गावांपैकी १२ गावांचे रखडलेले अनुदान उपलब्ध झाले असून, ते लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. केवळ इंदापूर तालुक्यातील एका गावाची मागणीच नसल्याने त्यांचे अनुदान प्राप्त झालेले नाही. यामुळे अडचणीत आलेला शेतकरी तसेच कृषी कर्मचाऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. लाभार्थी शेतकरी व कृषी कर्मचाऱ्यांनी कृषी आयुक्त विकास देशमुख, कृषी अधीक्षक सुभाष काटकर आणि ‘लोकमत’चे आभार मानले आहे. ‘लोकमत’नेच आम्हाला न्याय मिळवून दिल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत तीन वर्षांपूर्वी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात मोठा गाजावाजा करीत कोरडवाहू शेती विकास अभियान सुरू केले होते. या योजनेत राज्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करून तेथील कोरडवाहू शेतीचा विकास करण्यासाठी तीन वर्षांसाठीचा (सन एप्रिल २०१३ ते मार्च २०१६) विकास आराखडा करण्याचे आदेश होते. त्या आराखड्यानुसार त्या गावातील कोरडवाहू जमिनीचा तीन वर्षांत संपूर्ण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. योजनेच्या माध्यमातून शेततळ्यासाठी १०० टक्के अनुदान व इतर कामासाठी ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांनी आपापली शेती विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. शेती विकास व शेतीपूरक व्यवसायाला मोठा हातभार लागणार असल्याने योजनेत सहभागी गावातून प्रचंड सहभाग मिळाला होता. या अभियानासाठी साकुर्डे (पुरंदर), कुरंगवाडी (भोर), सोंडेकार्ला (वेल्हे), मुकाईवाडी - बोतरवाडी (मुळशी), कडझे (मावळ), वाडे बोल्हाई (हवेली), आडगाव सुपे (खेड), लोणी (आंबेगाव), नळावणे राजुरी (जुन्नर), खैरेनगर (शिरूर), जोगवडी (बारामती), कौठडी (दौंड) आणि म्हसोबावाडी (इंदापूर) या १३ गावांचा अभियानात सहभाग होता. तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठा प्रतिसाद मिळून साधारणपणे तीन वर्षांसाठी दोन ते चार कोटींचे विकास आराखडे तयार झालेले होते. >शासनाचा याबाबतचा कोणताच निर्णय नसून केवळ अभियानातील कामेच उरकली जाणार आहेत. पुणे जिल्ह्यातील केवळ इंदापूर तालुक्यातील एकाच गावाचे अनुदान मागणीच नसल्याने प्राप्त झालेले नाही. उर्वरित सर्वच १२ गावांचे अनुदान प्राप्त झाले आहे.- सुभाष काटकर,कृषी अधीक्षक > अत्यंत महत्त्वाकांक्षी व शेतीस सहायक ठरणारे हे अभियान तसेच पुढे सुरू राहावे अशी आमची मागणी आहे. मात्र शासनच गंभीर दिसत नाही. - सुरेश सस्ते,शेतकरी, साकुर्डे