शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासह अवकाळीचे संकट

By admin | Updated: March 8, 2016 01:08 IST

परिसरामध्ये सध्या सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे चारा आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकरी करत आहे

वडापुरी : वडापुरी (ता. इंदापूर) परिसरामध्ये सध्या सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे चारा आणि पाणीटंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकरी करत आहे. मिळणारे उत्पन्न व त्यावरील होणारा खर्च याचा काहीच ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. अत्यल्प पावसामुळे जमिनीमधून काहीच उत्पन्न घेता आले नाही. तर अवकाळी पावसाच्या दणक्याने शेतातील पिके मातीमोल होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. वडापुरी, अवसरी, सुरवड, काटी, रेडा, रेडणी, वरकुटे, अभंगवस्ती, राऊतवस्ती, पंधारवाडी या परिसरात खरिपाबरोबरच रब्बीचे उत्पादन कमी प्रमाणात निघाल्याने चाराटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांना लागणारा चारा कोठून आणावा, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर आहे. विहिरींनी, विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. शेतात कामच नसल्याने मजुरांना रोजगारच मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याही उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.(वार्ताहर)कमी दूधदराने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे पाहिले जाते. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पशुधन मोठ्या प्रमाणात सांभाळले होते. परंतु, दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन कमी करण्यात येत आहे. तसेच दुधाला सध्या मिळणारा दरही अल्प आहे. दुधाचा उत्पादन खर्च आणि दूधदरामधील तफावत यामुळे दुग्धव्यवसाय कोलमडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पशुधन बाजारात विक्रीला जात आहे. भीषण दुष्काळामुळे रोजंदारीचा प्रश्न ऐरणीवर वडापुरी परिसरातील जिरायती भागात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे या भागातील अनेक मजुरांना आपल्या बिऱ्हाडासह शहाराच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. सलग चार ते पाच वर्षांपासून पडलेल्या भीषण दुष्काळामुळे रोजगार कमी झाल्याचे या भागात पाहावयास मिळत आहे. भीषण दुष्काळामुळे रोजंदारीचा प्रश्न ऐरणीवर वडापुरी परिसरातील जिरायती भागात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे या भागातील अनेक मजुरांना आपल्या बिऱ्हाडासह शहाराच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे. सलग चार ते पाच वर्षांपासून पडलेल्या भीषण दुष्काळामुळे रोजगार कमी झाल्याचे या भागात पाहावयास मिळत आहे.