शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून ठिबकचे अनुदान रखडले

By admin | Updated: February 7, 2017 02:56 IST

शेतकऱ्यांना ठिबकसाठी दिले जाणारे अनुदान पाच वर्षे रखडले आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात सन २०१२-१३ ते २०१५-१६ या पाच वर्षांतील ठिबक केलेल्या ९ हजार ५६३ शेतकऱ्यांचे

सोमेश्वरनगर : शेतकऱ्यांना ठिबकसाठी दिले जाणारे अनुदान पाच वर्षे रखडले आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात सन २०१२-१३ ते २०१५-१६ या पाच वर्षांतील ठिबक केलेल्या ९ हजार ५६३ शेतकऱ्यांचे अनुदानापोटीचे ३६ कोटी २८ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना राज्य सरकार ठिबक करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. मात्र शेतकरी पदरचे पैसे गुंतवून शेतामध्ये ठिबक सिंचन योजना राबवित आहे. बारामती तालुक्यात तीन वर्षांचे २ कोटी ९२ लाख रुपये ठिबकचे अनुदान रखडले आहे. हा आकडा जिल्हास्तरावर तब्बल ३६ कोटी २८ लाखांच्या घरात जात आहे. पुणे जिल्ह्यातील सन २०१२-१३ या वर्षात ठिबक सिंचन राबविलेल्या शेतकऱ्यांपैकी १५०० शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचे ६ कोटी ५६ लाख रुपये देणे बाकी आहे. सन २०१३-१४ यातील ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांपैकी २९२२ शेतकरी ११ कोटी ६५ लाख रुपयांच्या अनुदानापासून वंचित आहेत. सन २०१४-१५ यातील २१४१ शेतकरी ९ कोटी १७ लाख रुपयांच्या व सन २०१५-१६ यातील ३ हजारांच्या आसपास शेतकरी ८ कोटी ९० लाख अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आघाडी सरकारच्या काळात ठिबकवरील ठरलेल्या अनुदानापैकी ८० टक्के केंद्र सरकार व २० टक्के राज्य सरकारने अनुदान अदा करण्याचा फॉर्म्युला ठरलेला होता. मात्र आता भाजपा सरकारच्या काळात हा फॉर्म्युला ५०-५० वर आला. ठरलेल्या अनुदानापैकी केंद्र सरकार ५० टक्के व राज्य सरकार ५० टक्के असे अनुदान अदा करण्याचे ठरले होते. मात्र, याबाबत कोणतीच अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांना ६० टक्के व पाच एकरांवरील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याचे ठरले असतानाही राज्यसरकारने गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान दिलेच नाही. केंद्र सरकार त्यांच्या हिश्श्याचे ५० टक्के अनुदान वेळेवर देत आहे. (वार्ताहर)