शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वीसगाव खोऱ्यातील गावांत धोमचे पाणी पोहोचेना

By admin | Updated: May 12, 2017 04:43 IST

भोरच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात सोळा गावांचा समावेश होतो. या गावांच्या माथ्यावर धोम (ता़ वाई) धरण असून, याचे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरे : भोरच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात सोळा गावांचा समावेश होतो. या गावांच्या माथ्यावर धोम (ता़ वाई) धरण असून, याचे पाणी वीसगाव खोऱ्याला मिळण्यासाठी धोम-बलकवडी डावा कालवा पाच वर्षांपूर्वी डोंगर पोखरून काढण्यात आला़ मात्र, या पाण्याचा उपयोग वीसगावच्या पश्चिमेकडील गावांना होत असून, वीसगावाना पाणी असूनही ते मिळत नसल्याने ‘पाणी उशाला अन् कोरड घशाला’ अशी झाली आहे़धोम-बलकवडी डावा कालवा आंबवडे खोऱ्यातील चिखलगाव व कर्नावड गावच्या शेजारील दोन डोंगर फोडून वीसगाव खोऱ्यातून पश्चिमेकडे नेलेला आहे़ या पाण्याचा येथील शेतकऱ्यांना पाणी परवाना मिळाला नसल्याने उपयोग होत नाही़ या कालव्याला गोकवडी येथील उंबरीची ओव्होळ येथे मोठ्या प्रामाणावर गळती आसल्याने कालव्या खालील अनेक शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर शेती नापीक झाली आहे़ हा कालवा पाले, पळसोशी, वरवडी, आंबाडे, नेरे, बालवडी या गावांशेजारून गेला आसला, तरी बारामाही या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ यातील काही गावांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे़ धोम-बलकवडी धरणाचे आवर्तन सोडले तरी ही गावे उंचवट्यावर असल्याने पिण्याचे पाणी मिळत नाही़ या उन्हाळ्याच्या दिवसात या गावांची अतिशय गंभीर स्थितीती असून, पाण्यासाठी महिलांना, नागरिकांना दूरपर्यंत पायपीट करावी लागते.कालव्या खालील गावांना तुरळक प्रमाणात पाणी मिळत असते़ या परिसरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी वीसगाव खोरे पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़