शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 01:49 IST

सुभाषनगरमध्ये सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात या रस्त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात

पुणे : सुभाषनगरमध्ये सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात या रस्त्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. बांधकाम, वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये, असे आदेश असतानाही महापालिकेच्या रस्त्यांच्या कामासाठी पिण्याच्या वापर केला जात आहे.यंदा पावसाने ओढ दिल्याने धरणांमध्ये खूप कमी पाणीसाठा झाला आहे. यापार्श्वभूमीवर उपलब्ध असलेले पाणी १५ जुलै २०१६ अखेर पर्यंत पुरविण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे उभे टाकले आहे. यादृष्टीने पाण्याचा गैरवापर रोखण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सुभाष नगर येथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्याचे काम पथ विभागाकडून ९ डिसेंबर २०१५ पासून हाती घेण्यात आले आहे. मार्च २०१६ मध्ये हे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. सोसायटयांमधील नळ कनेक्शनचे पिण्याचे पाणी घेऊन ते रस्त्यावर फवारले जात आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ऋषी बालगुडे यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार नोंदविली आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने शहराच्या पाण्यात आणखी कपात करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे टंचाईचा सामना करावा लागू नये यादृष्टिने आतापासून खबरदारी घेणे आवश्यक आहे.