घोडेगाव : डिंभे धरण उजव्या कालव्याला मंगळवारी (दि. १२) सकाळी पाणी सोडले जाणार आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. शेतीला पाणी उचलता येणार नाही. अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता यांचे संयुक्त पथक नेमण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी डिंभे धरण उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यास मान्यता दिली आहे. सुमारे २५ ते ३० दिवसांचे आवर्तन असणार आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्यातील काही भागांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने हे पाणी पिण्यासाठी सोडले जाणार आहे. त्यामुळे लोकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व विनापरवाना पाणी उचलू नये, विद्युत वितरण कंपनीला थ्रीफेज मोटारी चालणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई पाहता लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे यांनी केले आहे. ग्रामसेवक, तलाठी, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी सतत कालव्यावर फिरून यावर लक्ष ठेवणार आहेत. पाण्याचा अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून लोकांनी याची दक्षता घ्यावी, असे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नुर यांनी सांगितले आहे. (वार्ताहर) चोरून अथवा कालवा फोडून पाणी घेणाऱ्यांवर कुकडी पाटबंधारे विभागाकडून कारवाई करणार आहे. यासाठी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता यांचे संयुक्त पथक नेमण्यात आले आहे. अशी तीन पथके नेमण्यात आली असून त्यांना प्रत्येकी तीस किलोमीटर वाटून देण्यात आले आहे.सुमारे २५ ते ३० दिवसांचे आवर्तन असणार आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्यातील काही भागांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने हे पाणी पिण्यासाठी सोडले जाणार आहे.
उजव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी
By admin | Updated: April 12, 2016 04:26 IST