शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या कचेरीत दारूने अंघोळ, १५ दिवस सलग आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:45 IST

संपूर्ण दारूबंदीसंदर्भात महसूल, राज्य उत्पादनशुल्क व पोलीस आदी विभागांनी गळचेपी भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलक, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी गुरुवारी तहसीलदारांच्या दालनात दारूने अंघोळ केली.

शिरूर : तालुका संपूर्ण दारूबंदीसंदर्भात महसूल, राज्य उत्पादन शुल्क व पोलीस आदी विभागांनी गळचेपी भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलक, क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी गुरुवारी तहसीलदारांच्या दालनात दारूने अंघोळ केली. या वेळी पोलीस अधिकाऱ्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ‘अधिकारी मला व जनतेला वेठीस धरत असून, त्यामुळे १५ दिवस दररोज तहसीलदारांच्या दालनात दारूने अंघोळ करणार आहे,’ असा इशारा पाचंगे यांनी अधिकाºयांना दिला.पाचंगे यांनी तालुका दारूबंदीसाठी १ मार्चपासून सविनय कायदेभंग आदोलन सुरू केले. राज्य उत्पादनशुल्क विभागाने दारूधंद्यावर कारवाई करून दारूबंदी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घालावे; अन्यथा दारूने अंघोळ करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला होता. कालपर्यंत कोणत्याच विभागाच्या अधिकाºयांनी पाचंगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याने पाचंगे यांनी गुरुवारी तहसीलदार रणजित भोसले यांच्या दालनात दारू अंगावर ओतून दारूने अंघोळ केली. पोलीस उपनिरीक्षक युसूफ इनामदार यांनी त्यांच्या हातातून बाटली घेतली.दारूने अंघोळ करण्यापूर्वी पाचंगे यांनी अधिकाºयांशी चर्चा केली. डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या बैठकीत राज्य उत्पादनशुल्क खात्याने जी आश्वासने दिली, त्याबाबत त्या खात्याचे अधिकारी अमर कावळे यांना ‘काय कारवाई केली?’ असे पाचंगे यांनी विचारले. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूधंदे सुरू आहेत त्याबाबत काय म्हणणे आहे? असाही प्रश्न विचारला. याचबरोबर कलम ९३ नुसार दारूधंदेवाल्यांवर केलेल्या कारवाईची माहिती विचारली. मात्र, अधिकारी त्यांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. शिरूरसह ४ तालुक्यांसाठी (दौंड विभाग) उत्पादनशुल्क विभागाकडे ३ अधिकारी, ४ कर्मचारी व एक चालक एवढाच स्टाफ असल्याचे कावळे यांनी सांगितले. या वेळी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सचिव नम्रता गवारी, जिजाबाई दुर्गे, रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणी कडिले, जनाबाई मल्लाव, सुचित्रा डाळिंबकर, अंकुश जाधव, रोहिदास काळे, अशोक भुजबळ आदी उपस्थित होते.दारूबंदीची कारवाई न झाल्यास येत्या १५ दिवस दररोज तहसीदारांच्या दालनात दारूने अंघोळ करण्याचा इशारा पाचंगे यांनी दिला. याचबरोबर, तालुक्यातील दारूची दुकाने पेटवून देण्याचा इशाराही त्यांनी दिला.