शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दारू सोडा, दूध प्या!

By admin | Updated: December 30, 2016 04:34 IST

३१ डिसेंबर म्हटले, की सेलिब्रेशन, जल्लोष असेच काहीसे समीकरण पाहावयास मिळते. मात्र तरुणवर्गासाठी शिरूर पोलिसांनी ‘दारू सोडा, दूध प्या’ असा अनोखा उपक्रम यादिवशी

शिरूर : ३१ डिसेंबर म्हटले, की सेलिब्रेशन, जल्लोष असेच काहीसे समीकरण पाहावयास मिळते. मात्र तरुणवर्गासाठी शिरूर पोलिसांनी ‘दारू सोडा, दूध प्या’ असा अनोखा उपक्रम यादिवशी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मद्यपान, चंगळवाद करुन पाश्चात्त्य संस्कृती जोपासण्यापेक्षा भारतीय संस्कृती जोपासा व ३१ डिसेंबरच्या या अनोख्या उपक्रमाला प्रतिसाद द्या, असे आवाहन पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तरुणाईला केले आहे.३१ डिसेंबर विविध पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. यात खऱ्याअर्थाने सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षासाठी विविध चांगले संकल्प करणे अपेक्षित असते. अलीकडच्या काही वर्षात मात्र ३१ डिसेंबर साजरा करण्याची व्याख्या बदलत चालल्याचे चित्र आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा या तरुणाईवर बसू लागला आहे. यातून तरुणवर्ग बहकू लागला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ.जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गावडे यांच्या कल्पनेतून निकोप समाजवाढीसाठी ‘दारू सोडा, दूध प्या’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.गावडे म्हणाले ३१ डिसेंबरच्या रात्री अनेक तरुण, तरुणी, नागरिक आनंद साजरा करण्याच्या नावाखाली मद्यपान करतात. यातून बेभान बाईक चालविणे, कल्ला करणे असे प्रकार पाहावयास मिळतात. याचा समाजाला त्रास सहन करावा लागतो. म्हणून ३१ डिसेंबरला शिरूर पोलिसांच्या वतीने संध्याकाळी ७ ते रात्री ११ या वेळात एसटी बस स्थानकाजवळ ‘दारू सोडा, दूध प्या’ या उपक्रमांतर्गत तरुणांना दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाला तरुणांनी प्रतिसाद द्यावा व निकोप समाजवाढीसाठी हातभार लावावा, असे आवाहन गावडे यांनी केले आहे.