शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना सर्वेक्षणाचीच स्वप्ने

By admin | Updated: February 26, 2016 04:35 IST

पुणेकरांना गेल्या अनेक वर्षांपासून दाखविली जात असलेली स्वप्ने यंदाच्या वर्षीही सर्वेक्षणातच अडकली असून, त्यासाठीही काही लाखांच्या तरतुदी रेल्वे अंदाजपत्रकात करण्यात

पुणे : पुणेकरांना गेल्या अनेक वर्षांपासून दाखविली जात असलेली स्वप्ने यंदाच्या वर्षीही सर्वेक्षणातच अडकली असून, त्यासाठीही काही लाखांच्या तरतुदी रेल्वे अंदाजपत्रकात करण्यात आल्या आहेत. रेल्वे विद्यापीठ पुण्यात होणार, अशी अपेक्षा असताना ते वडोदऱ्याने पळविले आहे. पुणे आणि परिसरासाठी गेल्या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात केवळ सर्वेक्षणाच्याच घोषणा केल्या होत्या. त्यासाठी तरतूदही काही लाख रुपयांचीच करण्यात आली होती. यंदाही नेमके तेच झाले आहे. पुणे-कोल्हापूर आणि पुणे-मनमाड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. पुणे- कोल्हापूरसाठी २४ लाख १२ हजार, तर पुणे- मनमाड मार्गासाठी केवळ ५ लाख ४३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे- नगर अंतर कमी करणाऱ्या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठीही केवळ १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या पुणे-बारामती रेल्वेमार्ग अस्तित्वात असला, तरी व्हाया दौंडला वळसा घालून जावे लागते. सासवड- जेजुरी- मोरगावमार्गे दीड तासांत अंतर कापू शकणाऱ्या या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी केवळ साडेचार लाख रुपयांची तरतूद आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर या भागाच्या विकासासाठी रेल्वेचा फार मोठा सहभाग असणार आहे. यासाठी लोणावळा-पुणे-दौंड, पुणे-सातारा मार्गाला उपनगरीय दर्जा देण्याची मागणी होती. मात्र, याबाबत विचारही झाला नाही. पुणे-लोणावळा तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी निधीचीही तयार झाली आहे.पीएमआरडीए, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी यासाठी निधीचा हिस्सा देण्याची तयारी केली होती. रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे़ इतकी कमी तरतूद अर्थसंकल्पात होत राहिली, तर आज ७९५ कोटी रुपयांचा हा तिसरा मार्ग पूर्ण होण्यास पुढील १० वर्षे लागतील़ पुण्याहून दक्षिणेकडे व राजस्थान, उत्तरेकडे जाणाऱ्या नव्या गाड्या मिळतील, अशी पुणेकरांना अपेक्षा होती़ पण, कोणत्याही नव्या गाड्यांची घोषणा न केल्याने पुणेकर नाराज झाले आहेत.पुणेकरांवर प्रभूंची अवकृपापुणेकरांना अपेक्षा असलेल्या कोणत्याही मार्गाचे प्रतिबिंब रेल्वेमंत्र्यांच्या भाषणात दिसलेले नाही. पुण्याला रेल्वे विद्यापीठ व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती़ पण, हे विद्यापीठ वडोदऱ्याला मिळाल्याने मागणीला पाने पुसली असल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली़ पुणे रेल्वे स्टेशनवर रेल्वेगाड्या उभ्या करण्यास जागा नसल्याने त्याच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला, तसेच हडपसर टर्मिनलला मंजुरी देण्यात आली आहे़ मात्र, त्यासाठी केवळ १ लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे़ पुणे-मिरज-लोंढा या ४६७ किमी मार्गाच्या दुहेरीकरणासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद केली असली, तरी ते काम नेमके पुण्यापासून सुरु होणार की लोंढापासून हे अद्याप स्पष्ट नाही़ -संबंधित वृत्त/हॅलोकर्जत-लोणावळा चौथ्या मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी ९ लाख ९२ हजार, कल्याण-कर्जत तिसऱ्या मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी १० लाख २८ हजार रुपये तरतूद आहे. पुणे-नाशिक मार्ग तर रेल्वे विभागाकडूनच साईडिंगला टाकण्यात आला आहे. या मार्गासाठी केवळ ३ लाख १९ हजार रुपये तरतूद केली आहे.