शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम वॉचमन ते लालदिव्याचे स्वप्न

By admin | Updated: November 26, 2015 01:06 IST

दुष्काळ पाचवीला पूजलेला, गावात बसून आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहण्यापेक्षा पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेला बरा, या विचाराने हजारो विद्यार्थी पुण्यात आले..

पुणे : दुष्काळ पाचवीला पूजलेला, गावात बसून आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहण्यापेक्षा पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेला बरा, या विचाराने हजारो विद्यार्थी पुण्यात आले.. आई-वडिलांकडे किती दिवस पैसे मागायचे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी अभ्यासाला नोकरीची जोड देताना दिसत आहेत. त्यातील काही विद्यार्थी बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षारक्षकाची नोकरी पत्करून लालदिव्याच्या गाडीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एटीएममधील शांततेमुळे अभ्यास अन् मिळणाऱ्या पगारामुळे अभ्यास व उदरनिर्वाह हे दोन्ही हेतू ते साध्य करत आहेत.स्पर्धा परीक्षांचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तरुण-तरुणी हजारोंच्या संख्येने पुण्यात येतात. घरची स्थिती चांगली असणारे विद्यार्थी शहरातील नामांकित अभ्यासिकांमध्ये प्रवेश घेतात. लाखभर रुपये देऊन विविध विषयांच्या शिकविण्या लावतात. मात्र, आर्थिक स्थिती हलाखीची असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी पालिकाच्या किंवा स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यासिका निवडलेल्या आहेत. उदरनिर्वाहासाठी घरच्यांकडून पैसे मागण्यापेक्षा मिळेल ते काम करून ध्येय गाठण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. काही विद्यार्थ्यांनी उदरनिर्वाहासाठी विविध बँकांच्या एटीएममध्ये नोकरी निवडली आहे. एमटीएममध्ये अभ्यासासाठी पूरक वातावरण असल्याने दुसरे कोणतेही काम करण्यापेक्षा नाइलाजास्तव विद्यार्थी एटीएमच्या सुरक्षारक्षकाची नोकरी करणे पसंत करत आहेत.एसटीने येतात जेवणाचे डबेआपला मुलगा पुण्याला शिकायला गेला. अभ्यास करून तो मोठा साहेब होईल. घरून पैसे पाठविता येत नाही. खासगी खानावळ परवडणारी नाही. त्यामुळे आपल्या मुलाच्या खाण्याची आबाळ होऊ नये, या काळजी पोटी अनेक माता पुण्यापासून जवळ असलेल्या गावांहून येणाऱ्या एसटीच्या बसमधून मुलांसाठी दोन वेळचा डबा पाठवत आहेत. काही विद्यार्थी दररोज सकाळी स्वारगेट बस स्थानकावर जाऊन घरच्यांनी पाठविलेला डबा दुपारी व रात्री खाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. मूळचा जळगावचा असून, गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे. आईवडील शेती करतात. पाऊस नसल्याने फारसे उत्पन्न नाही. घरच्यांकडूनही पैसे मागता येत नाहीत. त्यामुळे मी एटीएम सुरक्षा- रक्षकाची नोकरी स्वीकारली. सुमारे सहा महिन्यांपासून नोकरी करत आहे. त्यातून साडेचार हजार रुपये मिळतात. त्यातून महिनाभराचा खर्च भागवत, मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो.- चंद्रकांत भारूडे, विद्यार्थी मी चांदवड येथून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलो. एमटीएम सुरक्षारक्षकाची नोकरी माझ्यासाठी केवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही. दिवसा अभ्यासिकेत अभ्यास करून, रात्री ११ ते सकाळी सात वाजेपर्यंत एटीएममध्ये अभ्यास करता येतो. त्यामुळे मी सुरक्षारक्षकाची नोकरी स्वीकारली. - रामनाथ कुंभारडे, विद्यार्थी