शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचे स्वप्न महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 01:18 IST

शासनाने रेडी रेकनरच्या दरात १ एप्रिलपासून वाढ केली आहे. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये रेडी रेकनरच्या दरात ६ टक्क्यांनी, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

पिंपरी : शासनाने रेडी रेकनरच्या दरात १ एप्रिलपासून वाढ केली आहे. पुणे महापालिका क्षेत्रामध्ये रेडी रेकनरच्या दरात ६ टक्क्यांनी, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६.६७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील सदनिका तसेच भूखंडाचे दर वाढणार असून, सदनिका अथवा भूखंड खरेदी करणे महागडे होणार आहे.ग्रामीण भागातील (पुणे जिल्हा) रेडी रेकनर दरामध्ये ९.३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर परिसरात ७,७९९ रुपये प्रति चौरस फूट असा रेडी रेकनरचा दर राहणार आहे. चिंचवड येथे ७,१६७ रुपये प्रति चौरस फूट दर राहील. आकुर्डी, भोसरी, निगडी, दिघी, चऱ्होली, किवळे या भागातील दर पिंपळे सौदागर आणि चिंचवडच्या तुलनेत कमी आहेत. वाकड येथील सदनिकांचे दर सध्या ४६२० ते ७७७०, पिंपळे सौदागर ५५३० ते ८०७० रुपये प्रतिचौरस फूट असे दर आहेत. चिंचवड येथील सदनिकांचे दर ५३०९ ते ५५७५, हिंजवडीत ४८८६ ते ५१९० प्रतिचौरस फूट दर आहेत. पिंपळे सौदागर, चिंचवड आणि वाकड भागात सदनिकांचे दर शहरातील अन्य भागांच्या तुलनेत अधिक होणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत शासनाने नुकताच निर्णय जाहीर केला आहे. बांधकामे नियमित होणार असली, तरी त्यासाठी दंड आकारला जाणार आहे. रेडी रेकनरच्या दराच्या आधारे नियमितीकरणाचा दंड किती आकारला जावा, हे निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे रेडी रेकनरच्या वाढत्या दराचा फटका दंड भरून अनधिकृत बांधकामे नियमित करणाऱ्यांनाही बसणार आहे. अगोदरच शासनाच्या शास्तीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अवैध बांधकामांना तिप्पट शास्ती आकारली जात होती. शास्तीने त्रस्त झालेल्या नागरिकांना अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित होणार, या निर्णयाने दिलासा मिळाला होता. परंतु, रेडी रेकनरच्या दरवाढीमुळे आगामी काळात अनधिकृत बांधकामे नियमितीकरणावेळी मोठा आर्थिक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे. (प्रतिनिधी)