शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

दहशत माजविणारा बिबट्या जेरबंद

By admin | Updated: September 19, 2015 04:42 IST

मांजरी, आव्हाळवाडी, वाघोलीतील चोखी ढाणी परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बछड्यांसह वावर असणारा बिबट्या वन विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात

वाघोली / मांजरी : मांजरी, आव्हाळवाडी, वाघोलीतील चोखी ढाणी परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बछड्यांसह वावर असणारा बिबट्या वन विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.शुक्रवारी सकाळी ७च्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन बछडे अद्यापही सापडले नसून जेरबंद बिबट्या जुन्नर-माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये हलविण्यात आला आहे. वाहनांना आडवे जाणे, कुत्र्यांची शिकार करणे, पाळीव जनावरांच्या वासरांना लक्ष्य करण्याचे प्रकार बिबट्याकडून केले जात होते. शनिवारी (दि. १२) जयप्रकाश द्विवेदी या कामगारावरला रात्रीच्या वेळी बिबट्याच्या बछड्यांनी हल्ला करून जखमी केले होते.या प्रकारानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. रात्रीच्या वेळी काठ्या, हत्यारे जवळ बाळगूनच बाहेर पडावे लागत होते. नागरिकांच्या तक्रारीवरून बाएफ कंपनीजवळ झुडपामध्ये एक पिंजरा आठ दिवसांपूर्वी बसविण्यात आला होता; मात्र सावज नसल्यामुळे बिबट्या काही त्यामध्ये जेरंबद होत नव्हता. वन विभागाकडे पिंजऱ्यात सावज ठेवण्याची विनंतीदेखील केली होती; परंतु वरिष्ठांचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत सावज ठेवता येत नाही, असे सांगून टाळाटाळ केली जात होती. तोपर्यंत नवनाथ आव्हाळे यांच्या गोठ्यातील ५ जनावरांचा फडशा बिबट्याकडून पाडला गेला होता. अखेर गुरुवारी वन विभागाच्या कार्यवाहीतील दिरंगाई पाहून माजी सरपंच नारायण आव्हाळे यांनी गावातील तरुणांच्या मदतीने नवनाथ आव्हाळे यांच्या घराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतीच्या जवळ पिंजरा हलविला. तोपर्यंत वन विभागाच्या वतीने सावज ठेवण्याची परवानगी आली असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी सायंकाळी बकरीचे सावज पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले. शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकून उस्मान सय्यद आणि अन्वर खान या ठिकाणी आले आणि बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचे दिसले. दोघांनी तत्काळ आव्हाळवाडीतील नागरिकांना कळविले. तरुणांनी पिंजऱ्याला लगेच कुलूप लावून पिंजऱ्याजवळ ठाण मांडले. वन विभागालाही कळविल्यानंतर वनाधिकारी संतोष ताकवले, आर. टी. मगर, व्ही. व्ही. निकम या ठिकाणी दाखल झाले. स्थानिक तरुण आणि वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास जुन्नर-माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये हलविण्यात आले़पिंजऱ्यामध्ये अडकलेला बिबट्या ८ वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला आहे. माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये बिबट्याची सर्व तपासणी करण्यात येत असून, पूर्णपणे सदृढ आढळल्यास वनक्षेत्रामध्ये सोडून देण्यात येईल. त्या परिसरामध्ये काही संशयित आढळल्यास पुन्हा पिंजरा लावण्यात येईल.- सत्यजित गुजर, उप वनसंरक्षक पुणे