शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दौंडला मिळाले पाणी

By admin | Updated: May 6, 2016 05:45 IST

खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दौंड तालुक्यातील ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली

यवत : खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दौंड तालुक्यातील ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली. गुरुवार (दि. ५) दुपारच्या सुमारास तालुक्यात पाणी पोहोचले. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने दौंड शहर व तालुक्यातील गावठाणांतील नागरिक कालव्यातील पाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. पुण्यातील राजकीय विरोधानंतर हे पाणी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले आहे. परंतु, पाणी कधी येणार, याची ग्रामस्थ वाट पाहत होते. राजकीय गदारोळ आणि विरोधानंतरदेखील पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंड व इंदापूर या तालुक्यांसाठी १ टीएमसी पाणी कालव्याद्वारे देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. दौंड तालुक्याला पिण्यासाठी पाणी दिले जावे, अशी आग्रही मागणी करणारे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांचे आभार मानले आहेत.गुरुवारी दुपारी कालव्यातील पाणी दौड तालुक्यात पोहोचले. मात्र, या पाण्यासमवेत पुणे शहरात कालव्यात टाकण्यात आलेला कचरादेखील प्रवाहाबरोबर वाहत येताना दिसत होता. यामुळे टंचाईच्या काळात मिळालेले पाणीदेखील दूषित आणि कचरायुक्त असल्याचे दिसून येत होते. दौड तालुक्यात धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी धरणग्रस्तांना देऊन त्याग केला आहे. तर, धरणात जमिनी गेलेले शेतकरीदेखील आता पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत असताना, दौंडच्या हक्काचे पाणी पुण्यातील जनतेला पिण्यासाठी दिले जात आहे. आता शेतीसाठी नाही तर निदान पिण्यासाठी तरी पाणी मिळावे, याकरिता दोन्ही तालुक्यांतील नागरिक मागणी करीत आहेत. एकीकडे मिरजमधील पाणी दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेने दिले जाताना मिरजेच्या जनतेने सहकार्य केले, तर दुसरीकडे दौंड तालुक्यातील जनता तिचे हक्काचे पाणी शेतीसाठी न मागता निदान पिण्यासाठी मिळावे, यासाठी मागणी करीत असताना पुण्यातील सुजाण व सुज्ञ नागरिक त्याला विरोध करतात, ही शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया दौड तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली. (वार्ताहर)१३ मेपर्यंत आवर्तनदि. १३ मेपर्यंत कालव्यातून दौंड व इंदापूर तालुक्यांसाठी पिण्याकरिता सोडण्यात आलेले आवर्तन सुरू ठेवण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तालुक्यातील दौंड शहर व गावोगावचे पिण्यासाठी असलेले तलाव व विहिरी या पाण्याने भरण्यात येणार असल्याने काहीसा दिलासा येथील ग्रामस्थांना मिळाला आहे.पाण्यासोबत कचराकालव्याची सफाई न झाल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात कचरा आला. यामुळे टंचाईच्या काळात मिळालेले पाणीदेखील दूषित आणि कचरायुक्त असल्याचे दिसून येत होते.