शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

नाट्यगृहांच्या तारखांचा घोळ

By admin | Updated: May 26, 2015 01:13 IST

नाट्यगृहांच्या तारखा मिळणे आणि त्या शासकीय किंवा खासगी कार्यक्रमांसाठी काढून घेतल्या जाणे हा नाट्यवर्तुळात नेहमीच वादाचा विषय राहिला आहे.

नम्रता फडणीसल्ल पुणेनाट्यगृहांच्या तारखा मिळणे आणि त्या शासकीय किंवा खासगी कार्यक्रमांसाठी काढून घेतल्या जाणे हा नाट्यवर्तुळात नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यनिर्मात्यांच्या बैठका झाल्या; पण परिस्थितीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. अद्यापही तारखांचा घोळ कायमच आहे. राजकीय दबावामुळे आजही नाट्यसंस्थांच्या तारखा काढून टाकल्या जात असल्याच्या तक्रारी काही निर्मात्यांनी केल्या आहेत. या तक्रारींना दुजोरा देत हे प्रमाण काही अंशी कमी झाल्याचा दावा व्यवस्थापकाकडून केला जात आहे, हे त्यातील विशेष!महापालिकेच्या नाट्यगृहांच्या तारखांचे वर्षभरात जानेवारी ते एप्रिल, मे ते आॅगस्ट आणि सप्टेंबर ते डिसेंबर असे चौमाही पद्धतीने वाटप केले जाते. जानेवारीच्या चौमाही वाटपासाठी नोव्हेंबरमध्ये अर्ज मागविले जातात. यामध्ये बहुतांश नाट्य निर्मात्यांकडून तारखांचे बुकिंग केले जाते. मात्र शासकीय कार्यक्रमांखेरीज अनेकदा खासगी कार्यक्रमांसाठी नाट्य संस्थांना दिलेल्या तारखा काढून टाकल्या जाणे ही नाट्यनिर्मात्यांची अनेक वर्षांपासूनची तक्रार आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या समवेत नाट्य निर्मात्यांच्या बैठका झाल्या. यात नाट्यगृहांच्या तारखा वाटपासंदर्भात नियमावली निश्चित करण्याबरोबरच त्या रद्द करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांनाच राहतील असा निर्णय घेण्यात आला. मात्र चार महिने उलटूनही सुधारित नियमावली तयार करण्यास मुहूर्त लागलेला नाही. नाट्यसंस्थांना दिलेल्या तारखा शासकीय कार्यक्रम असल्यास काढून घेण्याची तरतूद महापालिकेच्या नियमावलीत समाविष्ट आहे. मात्र अनेकदा शासकीय कार्यक्रमांखेरीजही खासगी किंवा व्यावसायिक कार्यक्रमांसाठी तारखा काढून टाकल्या जातात. अजूनही हिच परिस्थिती आहे.४केवळ राजकीय व्यक्तीच्या शिफारसपत्रामुळे खासगी संस्थांना तारखा देणे प्रशासनाला भाग पडत आहे. आपल्या निर्णयावर ठाम राहण्याऐवजी राजकीय हतबलतेमुळे नाट्यसंस्थांच्या तारखा खासगी संस्थांना देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. प्रशासन म्हणते...४कोणत्याही दोन खासगी संस्था एखादी तारीख परस्पर एकमेकांना देऊ शकत नाही. त्यासाठी संस्थेला कार्यक्रम रद्द करण्याकरिता व्यवस्थापनाकडे रीतसर अर्ज करावा लागतो. मगच तो कार्यक्रम रद्द करून दुसऱ्या संस्थेला दिला जातो. नाट्यनिर्मात्यांना देण्यात आलेल्या तारखा आजही काढून घेण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. विशेषत: शनिवार आणि रविवारच्या सुटीच्या दिवसांमधील आमच्या तारखा दिल्या जात आहेत. माझ्यासह अनेक नाट्यनिर्मात्यांना हे अनुभव आले आहेत. यासाठी आज (मंगळवारी) नाट्यनिर्मात्यांची बैठक बोलावण्यात आली असून, वेळप्रसंगी आंदोलनाचे शस्त्रही बाहेर काढले जाईल.- प्रवीण बर्वे, नाट्यनिर्माता१० जूनपर्यंत सुधारित नियमावली नाट्यगृहांच्या तारखा वाटपासंदर्भात नियमावली निश्चित करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला आहे. ही नियमावली करण्याचे काम सुरू असून, येत्या १० जूनपर्यंत सुधारित नियमावली तयार होईल.- भारत कुमावत, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर४खासगी संस्थांना तारखा दिल्या जाऊ नयेत, अशी मागणी नाट्य निर्मात्यांची असतानाही केवळ राजकीय दबावामुळे खासगी संस्थांचे कार्यक्रम किंवा वर्धापन दिनाला तारखा देणे प्रशासनाला भाग पडत आहे. यातच नाट्यसंस्थांचे पूर्वी किती प्रयोग झाले आहेत यावरदेखील त्यांना तारखा दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे.