शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:42 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा, तसेच शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर उद्यान येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे, दर्शनासाठी जमा होतात.

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा, तसेच शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर उद्यान येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे, दर्शनासाठी जमा होतात. त्या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी परिसरातील रोडवरील वाहतुकीमध्ये उद्या (दि. १४) सकाळी सहा वाजल्यापासून रात्री गर्दी कमी होईपर्यंत वाहतुकीत बदल करून वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोल्हाई चौकातून पुणे स्टेशनकडे जाणारा रस्ता, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, जी. पी. ओ. जंक्शनकडून बोल्हाई चौक, चर्च रोडवरील समाजकल्याण चौकातून फोटो झिंको प्रेसकडे जाणारा रस्ता तसेच अलंकार टॉकीज चौकातून जहाँगीर हॉस्पिटल चौकाकडे जाण्यास वाहनचालकांना मनाई करण्यात येत आहे.मालधक्का चौक ते बोल्हाई चौक ते पुणे स्टेशन, साधु वासवानी चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते नरपतगीर चौक, फोटोझिंको प्रेसजवळ वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे. पुणे स्टेशन परिसरात आलेल्या नागरिकांनी त्यांची वाहने आर. टी. ओ.शेजारी एस. एस. पी. एम. एस. संस्थेचे मैदान किंवा शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस ते गाडगीळ पुतळा या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा येऊ नयेत, अशा रीतीने पार्क करावीत.वाहतुकीस बंदी, तसेच पर्यायी रोडदोराबजी चौकातून अरोरा टॉवरकडे जाण्याऐवजी वाहनचालकांनी दोराबजी ते ब्लू नाईलसमोरून इच्छितस्थळी जावे. तारापोर रोड हॉटेल ग्रॅण्डकडून अरोरा टॉवर चौकाकडे वाहनास बंदी असून त्याऐवजी बँक हाऊस-तीन तोफा चौक या मार्गाचा वापर करावा. महात्मा गांधी रोडवरील हॉटेल नाझ चौकातून अरोरा टॉवर चौक वाहतूक बंद, नाझ चौकातून डावीकडे वळून बाटलीवाला बगीचामार्गे जावे. तीन तोफा चौक व सिल्व्हर ज्युबिली चौक मोटर्सकडून अरोरा टॉवरकडे येण्यास रोड वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहने तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट येथे पार्क करावी.