शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रियतेच्या दहा वर्षाला डीपीतील भ्रष्टाचाराचे उत्तर

By admin | Updated: January 29, 2017 04:21 IST

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाच्या वतीने प्रचारासाठी राष्ट्रवादीवर टीका म्हणून

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाच्या वतीने प्रचारासाठी राष्ट्रवादीवर टीका म्हणून निष्क्रियतेची दहा वर्षे असे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकास आराखड्याचे पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस गेली सलग १० वर्षे महापालिकेत सत्तेमध्ये आहे. त्याचाच आधार घेत भाजपाची निष्क्रियतेची १० वर्षे हे प्रदर्शन आयोजित केले आहे. वाहतुकीची कोंडी, बसखरेदीत आलेले अपयश, बीआरटीची दुरवस्था, खड्डेयुक्त रस्ते, अनियमित व अपुरा पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनातील अपयश, डेंगी, स्वाइन फ्ल्यू अशा साथरोगांनी घातलेले थैमान, मनपा रुग्णालयातील गैरसोयी, शिक्षण मंडळातील भ्रष्टाचार अशा विषयांची शंभरहून अधिक छायाचित्रे व कात्रणांचा प्रदर्शनात समावेश आहे. रविवारी (ता. २९ जानेवारी) सकाळी ११ वाजता पक्षाच्या जंगली महाराज रस्त्यावरील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या आवारात या प्रदर्शनाचे उद््घाटन होणार आहे. मंगळवार (ता. ३१ जानेवारीपर्यंत) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल, असे पक्षाने कळविले आहे.याला उत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या विकास आराखड्याचे पोस्टमार्टेम करण्यात येणार आहे. याविषयी सांगताना अजित पवार म्हणाले, ‘‘पुणे शहराचे भविष्यच या आराखड्याने धोक्यात आणले आहे. मेट्रो, बीआरटी यांच्या बाजूला एफएसआय, टीडीआर यांची खैरात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या उंच इमारती उभ्या राहतील त्याचा फार मोठा ताण नागरी सुविधांवर येणार आहे, त्याचा काहीही विचार या आराखड्यात केलेला नाही. नागरिकांच्या हितासाठी दवाखाने, मैदाने, उद्याने अशी आरक्षण ठेवण्यात आली होती, ती उठविण्यात आली आहेत. या सगळ्या गोष्टी जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत.’’(प्रतिनिधी)पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी; तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी या आराखड्याचा अभ्यास केलेला आहे. त्यावरून काही विशिष्ट लोकांच्या हितासाठी तो तयार करण्यात आला असल्याचे स्पष्ट दिसते. शहराचा विचार त्यात करण्यात आलेला नाही. या सर्व गोष्टी पक्षाच्या वतीने मतदारांना सांगण्यात येतील, असे पवार म्हणाले.