शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आमचं माळीण होऊन देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर व आहुपे खोऱ्यातील पाच गावे अति धोकादायक गावे म्हणून घोषित आहेत. त्यामध्ये भीमाशंकर ...

आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर व आहुपे खोऱ्यातील पाच गावे अति धोकादायक गावे म्हणून घोषित आहेत. त्यामध्ये भीमाशंकर खोऱ्यामध्ये काळवाडी हे गाव आहे. कित्येक वर्षे मृत्यूच्या छायेत हे गाव वसले आहे. गावच्या वरच्या बाजूला असलेल्या भव्य अशा डोंगरावर सुटलेल्या अवस्थेत मोठमोठाले दगड आहेत. या दगडांना थोडा जरी धक्का लागला तरी संपूर्ण गावावर हे दगड कोसळू शकतात. याच काळवाडीच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी व काही वर्षांपूर्वी धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे गावाच्या खालच्या बाजूला मोठा आवाज होऊन मोठी भेग पडली आहे. यामुळे डोंगर कोसळण्याच्या दहशतीत काळवाडी येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. काळवाडी नंबर एक व नंबर दोन त्याचप्रमाणे शेळकेवस्ती असे मिळून ७० ते ८० घर असणारे हे गाव आहे. पाच सहा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याच गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन उबड निघाले आहेत. तर या डोंगरावर असणारे सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून या गावातील घरांच्या भिंतींना ओल येऊन काही घरे कोसळायचे ही प्रकार घडले आहेत. शासन दरबारी कित्येक वर्षे या गावाच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव प्रलंबित आहे. माळीनसारखी घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्नही काळवाडी ग्रामस्थांना पडला आहे.

कोट

बा आम्ही वरच्या दगडाक पाहतोय अन् दगड आमच्याक पाहतोय. कधी आमच्यावर हे दगड घाला घालतील हे सांगता येत नाही. रातरात डोळ्याला डोळा न्हाय. घरामध्ये असलेल्या पेटत्या चुली मधुन पाण्याच उभड निघालत माळीन सारखा कव्हा घाला होईल सांगता येत न्हाय. सरकारी अधिकारी येतात; अन् म्हणतात तुम्ही सांजच्या पहारी वरती माचिचावाडीला झोपायला जा. अन सकाळ झाली का परत तुमच्या घरी परत जा. कित्येक वर्षी झाली आम्हा आशेला लावून सांगतात तुमच पुनर्वसन करू. मायबापांनो आमचं माळीन होऊन देऊ नका.

चिमा पारधी, दुंदा भोकटे, काळवाडी येथील ग्रामस्थ

चौकट

या काळवाडीच्या पुनवर्सनाचा विषय कित्येक दिवस शासन दरबारी पडुन आहे. पावसाळा सुरु झाला की प्रशासन व अधिकाऱ्यांना जाग येते. शासनाने तात्काळ या गावांचे पुर्नवसन करावे. या गावावरील डोंगरालाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. घरांना मोठ्या प्रमाणात ओलावा येवुन घरांमध्ये पाण्याचे बुडबुडे निघत आहेत. एखादी घटना घडण्यापुर्वी सरकारणे या बाबतची काळजी घ्यावी.

- विठ्ठल पारधी

सामाजिक कार्यकर्ते काळवाडी

फोटो ई मेल करत आहे.

फोटो खालचा मजकुर:-:-आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशं

कर खोऱ्यामध्ये मृत्युच्या छायेत वसलेले काळवाडी हे गाव.

(छायाचिञ संतोष जाधव)

तळेघर वार्ताहार संतोष जाधव