शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

कोरोनाबाबत हलगर्जीपणा करू नका; सर्वांनी गंभीरपणे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हलगर्जीपणा करू नका, सर्वांनी गंभीरपणे घ्या, गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपमुखमंत्री बोलत होते. अजित पवार म्हणाले, सध्या जिल्ह्यात तसेच बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. तसेच बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना राबवावी. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमासाठी लोकांची संख्या मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे. याकडे विशेष लक्ष द्यावे. रुग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. सॅनिटायझरचा वापर करावा, संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाºया वैद्यकीय साधन सामुग्री याची कमतरता भासणार नाही याचीही प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात केंद्रीय पथकाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाबाबत निरीक्षण केले आहे. पुढचे दोन महिने खूप धोक्याचे आहेत, असा त्यांनी इशारा दिला. त्यांच्या निरीक्षणावरून नियमावली तयार करण्यात आली आहे. त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपरिषद, महसूल विभाग, पोलीस विभाग यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बारामती येथील वैद्यकीय व प्रशासकीय अधिका-यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. म्हस्के, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेते सचिन सातव यांनी बारामती तालुक्यात कोविड नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि अडीअडचणी सांगितल्या.

पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र मनोजकुमार लोहिया म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाबाबत दुर्लक्ष होता कामा नये. ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉबिर्ड रुग्ण (सहव्याधी) यांना लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा. बैठकीला पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षण पुणे विभाग राहूल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, उपअभियंता विश्वास ओव्हाळ, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

बारामती पोलीस वसाहत, नूतन इमारत पायाभरणी समारंभ बारामती येथील पोलीस वसाहत नूतन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि कामांचा तपशील जाणून घेतला.

उपमुख्यमंत्री यांनी केली बारामती तालुक्यातील विकास कामांची पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुका फळ रोपवाटिकेच्या इमारतीचे बांधकाम, रस्त्याचे काम व परिसर, गुणवडी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येत असलेले वसतिगृह व परकाळे बंगला येथील कॅनॉलच्या भिंतीच्या कामाची पाहणी केली. कामे दर्जेदार आणि वेळेत झाली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांस दिल्या. तसेच बारामती येथील प्रियांका गवळी यांनी कोविडसाठी मदत म्हणून २५ हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सपूर्द केला.

—————————————

फोटो ओळी : बारामती तालुक्यातील विकासकामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

१३०३२०२१-बारामती-०२

——————————————