शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पौष पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र जेजुरीत गाढवांचा बाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 13:36 IST

यात्रेसाठी वैदू,  बेलदार, कुंभार, गाडीवडार, मातीवडार,  कैकाडी,  मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातीतील लाखो लोक जेजुरीत

ठळक मुद्देजेजुरीच्या वर्षाकाठी आठ मोठ्या यात्रांपैकी पौष पौर्णिमाची यात्रा काठेवाडी आणि गावठी जनावरे झाली दाखल

जेजुरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरणार आहे. येथील बंगाळी पटांगणावर बाजारासाठी काठेवाडी व गावठी जनावरे येऊ लागली आहेत. मात्र, येथे येणाऱ्या समाजबांधवांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. बहुजन समाजाचे कुलदैवत असलेल्या खंडोबादेवाच्या नगरीत पौष पौर्णिमा यात्रा खऱ्या अर्थाने अठरापगड जाती-जमातींची यात्रा मानली जाते. या यात्रेसाठी वैदू,  बेलदार, कुंभार, गाडीवडार, मातीवडार,  कैकाडी,  मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातीतील लाखो लोक जेजुरीत येऊ लागले आहेत. या समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे गाढव असल्याने यात्रेनिमित्त येथे गाढवांचा बाजार भरतो. उद्या गावठी व काठेवाडी गाढवांचा बाजार भरणार असून, परवा शुक्रवारी पौष पौर्णिमा सुरू होत असल्याने दोन दिवस जेजुरीगडावर मोठी गर्दी राहणार आहे. अशाच प्रकारचे बाजार मढी, सोनारी,  माळेगाव (नांदेड) या ठिकाणी भरतात; परंतु जेजुरीचा बाजार सर्वांत मोठा मानला जातो. राज्यभरातून येथे गाढवांसह भाविक येऊ लागले आहेत. जेजुरीच्या वर्षाकाठी आठ मोठ्या यात्रांपैकी पौष पौर्णिमाची यात्रा असते. राज्यभरातील अठरापगड जाती-जमातींची यात्रा म्हणून ही यात्रा प्रचलित आहे. यात्रेनिमित्त भरणारा हा बाजार ही एक परंपरा आहे. ती परंपरा मोडीत निघू नये यासाठी पालिका व शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. भाविकांना सोयी-सुविधा निर्माण करून देणे गरजेचे आहे, असे येथे गाढवे विक्री व खरेदीसाठी येणाºया व्यापाºयांनी सांगितले. चार वर्षांपासून बाजारात येणाºया जनावरांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ब्रूक हॉस्पिटल फॉर अ‍ॅनिमल इंडिया या केंद्रीय संस्थेच्या अश्वकल्याण प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील मेढा येथील श्रमिक जनता विकास संस्थेचे पशुवैद्यकीय अधिकारी विनायक पाटील, शामराव कुलकर्णी, शिवाजी ओमासे, समन्वयक लहू तरडे येथे आलेले आहेत. त्यांनी ही येथील असुविधांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.......सुविधांचा अभावच्राज्यभरातून अठरापगड जाती-जमातीच्या भाविकांना गाढवांचा बाजार भरतो तेच बंगाली पटांगण उतरण्याचे ठिकाण आहे. पूर्वी हे पटांगण प्रशस्त होते. पारंपरिक गाढवांचा बाजारही मोठ्या प्रमाणावर भरत असे. आता मात्र या पटांगणावर शाळा, ग्रामीण रुग्णालय, सुलभ शौचालय इमारती उभी राहिल्याने जागा कमी पडू लागली आहे. या पारंपरिक बाजारासाठी प्रशस्त जागा असणे गरजेचे आहे. च्अपुरी जागा असूनही तेथे स्वच्छता, साफसफाई केलेली नाही. सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे. शिवाय, पुरेशा उजेडाचीही येथे सोय नाही. येथे हायमस्ट लॅम्पची उभारणी केलेली आहे. मात्र तो बंद आहे. तात्पुरत्या हॅलोजनची व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्याची सोयही योग्य पद्धतीने केलेली नाही. रस्त्यावर पाण्याचा टँकर उभा करून पाण्याची सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्रा