येडगाव : बुधवारी सकाळी नारायणगावजवळील धनगरवाडी (ता. जुन्नर) येथे झालेल्या पिकअप-जीप व ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघातात उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या येडगाव येथील तरुण सचिन मुळे याच्या वडिलांनी दु:खद प्रसंगीसुद्धा समयसूचकता दाखवून आपल्या मुलाचे नेत्रदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. कारभारी मुळे असे त्या पित्याचे नाव आहे. अशा दु:खदप्रसंगी समयसूचकता दाखवून सचिनचे वडील कारभारी मुळे यांनी मुलाचे नेत्रदान करण्याची भूमिका घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वांकडून स्वागत केले जात असून, या गरीब कुटुंबाला सर्वांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे.
पित्याने केले मृत मुलाचे डोळे दान!
By admin | Updated: October 24, 2014 05:07 IST