शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ढोकसांगवी शाळेचे ‘आयएसओ’चे ढोंग उघड

By admin | Updated: June 10, 2015 04:51 IST

शाळेला सहा वर्षांपासून मुख्याध्यापक नाही, इमारत मोडकळीस आलेली, गळकं छप्पर आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी स्वच्छतागृहच नाही

प्रवीण गायकवाड, शिरूरशाळेला सहा वर्षांपासून मुख्याध्यापक नाही, इमारत मोडकळीस आलेली, गळकं छप्पर आणि महत्त्वाचं म्हणजे मुलींसाठी स्वच्छतागृहच नाही, अशा आणि याहूनही अनेक गंभीर त्रुटी असताना तालुक्यातील ढोकसांगवी जिल्हा परिषद शाळेला मिळालंय आयएसओ प्रमाणपत्र!विशष म्हणजे, या शाळेची पाहणी न करताच त्यांच्यावर ही मेहेरबानी करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांना आयएसओ ९००१ ते २००८ हे प्रमाणपत्र मिळाल्याचे समजल्यावर ‘लोकमत’ने यापैकी ढोकसांगवी जि.प. शाळेला भेट दिली. शाळेच्या दरवाजा नसलेल्या प्रवेशद्वारातच शाळेची ‘महती’ समजून आली. प्रवेशद्वाराच्या ठिकाणी प्रचंड चिखल व घाण आढळून आली. आत गेल्यानंतर प्रथम कळाले ते या शाळेला सहा वर्षांपासून मुख्याध्यापकच नाही. प्रमुख इमारतीच्या खिडक्या मोडकळीस आल्या आहेत. पावसाळ्यात शाळा गळते. जुन्या शाळेच्या मागील बाजूस नवीन इमारत उभी राहात असून ती अपूर्णावस्थेत आहे. मुलींसाठी स्वच्छतागृह नाही, स्वतंत्र वाचनालय नाही, खेळण्याचे मैदानही नाही. आयएसओसाठी या सुविधा असणे बंधनकारक आहे. इतर निकषांमध्ये वस्तू-उपकरणे ठेवण्यासाठी एक ठिकाण असावे तेही या शाळेत नाही. नियोजन कृती तपासणीची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. या शाळेत मात्र तसे नाही. प्रत्येक वर्ग खोलीमध्ये एक फॅन, एक लाइट असणे अपेक्षित आहे. मात्र, सर्व वर्ग खोल्यांमध्ये तसे दिसून आले नाही. स्वयंपाकगृह दुरवस्थेत आढळून आले. पिण्याच्या पाण्याचे शीतयंत्र, शुद्धीकरण यंत्रणा देखील असावी, असा निकष आहे. मात्र, तशी सुविधा या शाळेत अस्तित्वात नाही. वायू, पाणी, धूळ, ध्वनीचे प्रदूषण नसावे, अशी अट आहे. मात्र, येथे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी, धुळीचे प्रदूषण दिसून आले. वीज बचतीचे स्लो-गन लावणे अपेक्षित आहे. तेदेखील आढळून आले नाही. वाहनतळ असणे अपेक्षित आहे. मात्र, शाळेला वाहनतळ नाही. याप्रमाणेच आयएसओसाठी आणखीही अनेक निकष आहेत. एकंदरीत कोणत्याही परिस्थितीत ही शाळा आयएसओ मानांकनासाठी पात्र नाही, असे असताना या शाळेला आयएसओ दिले गेले, हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. तालुक्यातील जि.प. शाळा, ग्रामपंचायती तसेच अंगणवाड्यांना (ठरावीक) आयएसओ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. कोणतेही निकष न पाहता हे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. विभागीय आयुक्तांकडे चौकशीची मागणीयात भ्रष्टाचार झाल्याचा संशय क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी व्यक्त केला व या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. प्रमाणपत्र देणारी संस्था व अधिकाऱ्यांवर पाचंगे यांनी रांजणगाव एसआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ढोकसांगवी जि.प. शाळेच्या पाहणीतून प्रमाणपत्र वाटपाचा बोगसपणा सिद्ध झालेला आहे.