शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

जुन्नर येथे पाळीव कुत्र्यांनी मोडली बिबट्याची दहशत , बिबट्या गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 8:32 PM

धनगर वाड्यावरील मेंढ्यांच्या कळपावर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या बिबट्यावर दोन कुत्र्यांनी प्रतिआक्रमण करत जोरदार हल्ला चढविला. त्यात बिबट्याला गंभीर जखमी करत आपल्या मालकाचे नुकसान तर टाळलेच त्यासोबत बिबट्याची दहशत देखील मोडीत काढली.

ठळक मुद्देसुमारे अर्धा ते पाऊणतास बिबट्या व कुत्र्यांची ही झुंज सुरुजखमी झालेला बिबट्या एक वर्ष वयाचा असून तो नर जातीचा

विजय चाळक 

जुन्नर : बिबट्याकडून मानवी वस्त्यांवर सातत्याने हल्ले होत असतात. यातून त्याची मोठी दहशत माणसे तसेच पाळीव प्राण्यांमध्ये निर्माण झालेली आहे. परंतु, चक्क दोन कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला करुन एकप्रकारे त्याची वाढत चाललेली दहशतच मोडून काढली आहे. या दुर्मिळ घटनेत बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी ( दि.२९मे) चाळकवाडी ( ता जुन्नर) येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत बिबट्यानेही कुत्र्याला चावा घेऊन जखमी केले आहे जुन्नर तालुका हा बिबट्या प्रणवक्षेत्र असून तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले होतच असतात. चाळकवाडी येथील शेतकरी अनिल बबन सोनवणे यांच्या घराजवळ असलेल्या उपळीच्या ओढ्याशेजारील शेतात एक धनगराचा वाडा मुक्कामासाठी होता. या वाड्यावरील मेंढ्याच्या कळपावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याची चाहूल वाड्यावर असलेल्या दोन कुत्र्यांना लागल्यानंतर नी बिबट्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुत्र्यांची आक्रमकता पाहून बिबट्याने तेथील एका निरगुडीच्या झाडाचा आश्रय घेतला. त्यानंतर हा बिबट्या खाली उतरल्यानंतर या दोन्हीही कुत्र्यांनी पुन्हा त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्यानंतर कुत्र्यांच्या तावडीमधुन कशीबशी सुटका करत बाभळीच्या झाडाच्या आश्रयाला गेला. थोड्या अवधीने पुन्हा  बिबट्याने या कुत्र्यावर झेप टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र या दोन्हीही कुत्र्यांच्या गळ्यात दातेरी पट्टा असल्यामुळे बिबट्याचा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न फसला. सुमारे अर्धा ते पाऊणतास बिबट्या व कुत्र्यांची ही झुंज सुरु होती. या झुंजीत बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. तर बिबट्याने एका कुत्र्याला चावा घेतल्यामुळे कुत्र्याच्या कानाला व उजव्या पायाला जखम झाली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी असलेले सर्पमित्र आकाश माळी व वनरक्षक सी एस कांबळे वनरक्षक विभुते ए.जी मोमीन एस.ए.राठोड व्ही ए.अढागळे व त्यांचे सर्व सहकारी व स्थानिक नागरिकांनी बिबट्याची कुत्र्याच्या तावडीमधुन सुटका केली. जखमी झालेला बिबट्या एक वर्ष वयाचा असून तो नर जातीचा असल्याची माहिती वनरक्षक कांबळे यांनी दिली. जखमी झालेल्या बिबट्याला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात दाखल केले असून तेथील वैद्यकीय अधिकारी डाँ अजय देशमुख हे त्या बिबट्यावर उपचार करत आहेत.

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्या