शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याचा ३५ नागरिकांना चावा

By admin | Updated: July 6, 2017 03:00 IST

शहरात बुधवारी (दि. ५) पिसाळलेल्या कुत्र्याने ३० ते ३५ नागरिकांना चावा घेतला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शहरात बुधवारी (दि. ५) पिसाळलेल्या कुत्र्याने ३० ते ३५ नागरिकांना चावा घेतला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते.अप्पासाहेब पवार मार्ग, सिनेमा रोड, भिगवण चौकासह शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याने अचानक चावा घेण्यास सुरुवात केल्याने नागरिकांची धावपळ उडाली. मात्र, आक्रमक झालेल्या कुत्र्याने सिनेमा रस्त्यावर ११ जणांना चावा घेतला. त्यामुळे घाबरलेल्या रुग्णांनी खासगी रुग्णालय, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. काही जणांनी खासगी रुग्णालयातदेखील उपचार घेतले. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. मिरा चिंचोलीकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेले ३० रुग्ण उपचारांसाठी आज रुग्णालयात दाखल झाले होते. या रुग्णांना रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. सर्वांवर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. रुग्णालयात रेबीज प्रतिबंधक लशींचा पुरेसा साठा आहे. नागरिकांनी श्वान दंशाच्या उपचारांसाठी रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे डॉ. चिंचोलीकर म्हणाल्या.नगरपालिकेचे कर्मचारी, आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत या कुत्र्याचा शोध सुरूच होता.नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी बारामती शहरातील परिसर पिंजून काढला. शेवटी डॉ. अप्पासाहेब पवार मार्गावर या कुत्र्याला पकडण्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांना यश आले. अनेक नागरिकांना चावा घेऊन घायाळ झालेल्या अवस्थेत हे कुत्रे सापडले. या पिसाळलेल्या कुत्र्याच्या धुमाकुळामुळे नागरिकांत घबराट पसरली होती. एकाच वेळी ११ रुग्ण श्वानदंशाच्या उपचारांसाठी रग्णालयात आले होते. त्यांच्यावर तातडीने आवश्यक उपचार करण्यात आले. या सर्वांना कुत्र्याने चांगलाच चावा घेतला आहे. सर्वांना कुत्र्याचे दात लागल्याने जखम झाली आहे. त्यापैकी एका रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.- डॉ. अंजली खाडे