शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कुणी पाणी देता का पाणी?

By admin | Updated: May 2, 2015 05:29 IST

तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही.

पुणे : तब्बल ४५ लाखांच्या घरात पोचलेल्या पुणे शहरातील लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी गेल्या पाच वर्षांत शासन आणि पाटबंधारे विभागास वेळ मिळालेला नाही. महापालिकेकडून मानकांपेक्षा जास्त पाण्याचा वापर केला जात असल्याचे कारण पुढे करून पाटबंधारे विभागाकडून २०११ नंतर महापालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात येणारा करारही करण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे पाण्याचे योग्य पद्धतीने सुनियोजन होत नसल्याने दरवर्षी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरून ऐन उन्हाळ्यात पाण्याचे तट पेटत आहेत. महापालिकेस शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेस सध्याची लोकसंख्या गृहीत धरता दरमहा सव्वा टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानुसार, महापालिकेकडून शहरासाठी पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी जवळपास १५ ते १६ टीएमसी पाणी घेतले जाते. मात्र, कागदपत्रावर कुठेही या पाण्याच्या देवाणघेवाणीचा करार झालेला नाही. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस दरदिवशी १२५0 ते १३00 एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. त्यानुसार, १६ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तर भविष्यात शहराचा विस्तार गृहीत धरत महापालिकेस १९ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. राज्यशासनाने महापालिकेत आणखी नवीन ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने आणखी २ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)