शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तुरीसाठी बारदाना देता का?

By admin | Updated: March 16, 2017 02:03 IST

मागील वर्षी तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे दरदेखील वधारले होते. आता एकरी उत्पादनातदेखील वाढ झाली आहे.

बारामती : मागील वर्षी तुरीचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे दरदेखील वधारले होते. आता एकरी उत्पादनातदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे बारामतीच्या तूरखरेदी केंद्रावर आवक वाढली आहे. आजअखेर ५ हजार ७६० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. मात्र, ‘नाफेड’कडून आठवडाभरानंतरदेखील बारदाना उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे. पुणे जिल्ह्यासह शेजारच्या सोलापूर, सातारा, नगर आदी भागांतून तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. बारदान्याअभावी खरेदी थांबविण्यात आली होती. मात्र, पणन राज्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर पुन्हा खरेदी सुरू केली आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आजअखेर १,४०० क्विंटल तूर खरेदी केली. त्याचे ग्रेडिंग करून मार्केटच्या गोडाऊनमध्ये ठेवलीे. बारदाना उपलब्ध न झाल्यामुळे बाजार समितीने त्यांचा बारदाना यासाठी वापरला आहे. परंतु, नाफेडकडून बारदाना आजअखेरदेखील मिळत नाही, अशीच स्थिती आहे. कोल्हापूरच्या केंद्रावर २५ हजार पिशव्या बारदाना उपलब्ध होता. तो खरेदी करावा, असे सांगितले होते. परंतु, नाफेडकडून त्याला चांगला प्रतिसाद आला नाही. याच पार्श्वभूमीवर, बारदाना नसताना खरेदी केलेली १,४०० क्विंटल तूर गोडाऊनमध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. त्याला नाफेडने प्रमाणित केलेला बारदाना न मिळाल्यास गोडाऊनमध्ये ठेवलेला माल पुन्हा शेतकऱ्यांना घेऊन जाण्याची वेळ येणार आहे. मागील वर्षी तुरीची आवक कमी झाली होती. त्यामुळे सरकारने खासगी गोडाऊनवर धाडी टाकून बाजारात तूर आणली होती. आता तुरीला भाव चांगला आहे. त्यामुळे बहुतेक भागांत शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाला विशेष महत्त्व दिले. ग्रेडिंग न केलेल्या किरकोळ बाजारात तुरीची खरेदी ४ हजार ते ४,२०० रुपयांनी केली जाते. परंतु, बाजार समितीच्या तूरखरेदी केंद्रावर चाळणी लावून ग्रेडिंग केलेल्या तुरीला प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये दर मिळत असल्याने स्थानिकांसह परिसरातील मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची आवक बारामतीच्या केंद्रावर वाढलेली आहे. आतापर्यंत २ कोटी ८८ लाख रुपयांची तूरखरेदी झाली आहे. त्यातील शेतकऱ्यांना १ कोटी ८८ लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. १ कोटी रुपये देणे बाकी आहे, असे असताना तुरीची एकीकडे आवक वाढत आहे. तर दुसरीकडे, तूर ठेवण्यासाठी बारदानाच उपलब्ध होत नाही. शासनाने केंद्रावर आलेली सर्व तूर खरेदी करावी, असे आदेशच दिले आहेत. त्यामुळे आजअखेर १,४०० क्विंटल खरेदी केलेली तूर गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली आहे. यासाठी नाफेडकडून बारदाना उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा तूर घरी न्यावी लागेल. या संदर्भात बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले, की तुरीची आवक यंदा वाढली आहे. (प्रतिनिधी)