शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोणी ‘पाणी देता का, पाणी?’, शासनाची उदासीनता मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 06:14 IST

कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण झालेली झाडेझुडपे, दुर्मिळ झालेले पाणीसाठे आदींमुळे मुक्या पशुपक्षी, वन्यप्राण्यांना आपल्या

राजेगाव : कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण झालेली झाडेझुडपे, दुर्मिळ झालेले पाणीसाठे आदींमुळे मुक्या पशुपक्षी, वन्यप्राण्यांना आपल्या जिवाला मुकावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील वनविभागाच्या क्षेत्रात पाहायला मिळताना सध्या दिसत आहे. मानवी जीव आपली तहानभूक कसेही भागवतील; मात्र हे मुके वन्यजीव ‘कुणी पाणी देता का पाणी?’ अशी हाक कोणाला मारणार?सध्या उन्हाची चाहूल अधिक वाढल्याने मानवी शरीराची लाही लाही होताना दिसत आहे. त्यातच इथले काही विहिरी, कूपनलिकासुद्धा कोरड्या पडू लागल्या आहेत. या भागाला भीमा नदीपात्राचा आधार आहे. तोही आता कमी कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मानवी जीवनाला देखील यंदा विचार करण्याची वेळ आली. वन्यप्राण्यांना ओला चारा मिळणे तर दूरच; पण आपली तहान भागवण्यासाठी थोडे पाणीही उपलब्ध होत नाही, याची मोठी खंत निसर्गप्रेमींना वाटत आहे. आपला वनातील अधिवास सोडून हे वन्यजीव आपल्या जिवाची तमा न बाळगता पोटापाण्यासाठी थेट लोकवस्तीत येऊ लागल्याचे मोठे आश्चर्य दिसून येत आहे. वन्यप्राण्यांचे संवर्धन व्हावे यासाठी शासन कार्य करत असतानादेखील शासनाची ही उदासीनता या मुक्या प्राण्यांच्या जिवावर बेतत आहे.राजेगावच्या परिसराला मोठ्या प्रमाणावर वन व उजनी क्षेत्र लाभलेले आहे. या क्षेत्रात प्रामुख्याने ससे, मोर, लांडगा, कोल्हा, हरीण-काळवीट आदी विविध जातीचे पशुपक्षी दिवसाढवळ्या राजेगावनजीक मानवी वस्त्यांवर भटकंती करत अनेक दुर्घटनांचे बळी ठरत आहेत. यासाठी या वन्यप्राण्यांची मानवी वस्तीतील भटकंती थांबवण्यासाठी शासनस्तरावर जागोजागी पाणवठे करण्याची मोहीम जलद गतीने सुरु होणे खूप गरजेचे आहे.सध्या सोशल मीडियावर पशुपक्ष्यांच्या बचावासाठी जागृती करणारे अनेक संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहेत. यामधून पक्ष्यांना धान्य व पाणी ठेवण्याचे मोठे सत्कार्य अनेक नागरिक करत आहेत. येथील पक्षिप्रेमी यांनी सोशल मीडियातच नव्हे तर प्रत्यक्षात शाळा, विद्यालये आदींमध्ये हे उपक्रम राबवून पक्षी बचावाचे संदेश देत आहेत. शासनानेदेखील अशा वन्यजीव व पशुपक्ष्यांच्या जिवासाठी उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. निसर्गातील या जिवांना चारा व पाणी देऊन जगवण्याची जबाबदारी आपलीच हेपण तेवढेच खरे ना!