शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोणी लस देता का लस ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कमला नेहरू रूग्णालय व राजीव गांधी रूग्णालय वगळता, शहरातील अन्य ११२ लसीकरण केंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कमला नेहरू रूग्णालय व राजीव गांधी रूग्णालय वगळता, शहरातील अन्य ११२ लसीकरण केंद्र ही लसीअभावी सध्या बिनकामाची ठरली आहे़ अमूक एक ठिकाणी लसीकरण केंद्र आहे, पण ते नावालाच अशी परिस्थिती सध्या शहरात आहे़ पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोस घेण्याची तारीखही उलटून गेली पण, लसच उपलब्ध नसल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे़

शहरात लस कधी येणार, आली तरी ती कोणत्या वयोगटासाठी मिळणार, दुसऱ्या डोससाठीचे काय नियोजन आदी प्रश्न सध्या आ वासून उभे आहेत़ अशा परिस्थितीत राज्य शासन केंद्राकडून लस आली की लागलीच महापालिकेला पुरविली जाईल, असे आश्वासन देण्यात येत आहे़ शहरात ३० एप्रिलला केवळ ५ हजार लसीचे डोस आले होते तेही, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी़ आता हे पाच हजार डोसही ७ मे पर्यंत वापरण्यात येणार आहे़ तर दुसरीकडे ४५ वर्षे वयोगटावरील लसीकरण व नागरिकांना दुसरा डोस कधी मिळणार याबाबत मात्र संभ्रह निर्माण झालेला आहे़

------------------------

‘न आलेल्या लसीचे नियोजन’

महापालिकेने १ मे पासून १८ ते ४४ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी तथा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल यासाठी नियोजन केले़ प्रत्येक प्रभागात दोन लसीकरण केंद्र, १२ हजार लोकसंख्येमागे एक केंद्र, तर युवा वर्गाला स्वतंत्र व्यवस्था करून लसीकरण करावे यासाठीही आखणी करण्यात आली़

परंतु, या ‘न आलेल्या लसीचे’ नियोजन आता पूर्णत: बारगळे असून, सध्या महापालिकेची स्थिती ‘आडात नाही तर पोहºयात कुठून येणार’अशी झाली आहे़ आहे त्याच लसीकरण केदं्राना लस उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असताना, ७ मे नंतर पुढे १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला लस कशी व कुठे द्यायची ही प्रश्न अनुत्तरीतच आहे़ सध्या केवळ दोन केंद्रांवर लसीकरण सुरू असून, येथेही तीन दिवसात केवळ अ‍ॅप नोंदणीच्या प्रकियेमुळे निम्मेच लसीकरण होऊ शकले आहे़

---------------------