शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेला सायकली हव्यात का?

By admin | Updated: November 28, 2015 00:57 IST

महापालिका प्रशासनाने ठेवलेला अर्धवट प्रस्ताव आणि पालिका आयुक्तांकडे माहितीची कसलीही विचारणा न करता आयुक्तांनी माहिती दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर

पुणे : महापालिका प्रशासनाने ठेवलेला अर्धवट प्रस्ताव आणि पालिका आयुक्तांकडे माहितीची कसलीही विचारणा न करता आयुक्तांनी माहिती दिल्याशिवाय प्रस्ताव मंजूर न करण्याचे स्थायी समितीने लावून धरलेले पालुपद यांमुळे शहरासाठीचा सर्वंकष सायकल आराखडा गेल्या महिनाभरापासून स्थायी समितीसमोर पडून आहे. विशेष म्हणजे, या आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल १ कोटी १५ लाखांचा खर्च येणार असला, तरी त्यातील ८० टक्के खर्च म्हणजेच ९२ लाख रुपये केंद्र शासन देणार आहे, तर अवघा २० टक्के म्हणजेच २३ लाख रुपयांचा खर्च महापालिकेला उचलावा लागेल.यामुळे शहरातील तब्बल १०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आलेले १२३ किलोमीटचे अतिक्रमण, कचरा, तसेच तोडफोडीमुळे पडून असलेले सायकल ट्रॅक प्रत्यक्षात वापरात येणार आहेत. मात्र, तरीही निधी नसल्याचे कारण सांगून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिकेने शहरात सायकलींना गतवैभव मिळवून देण्यासाठी सुमारे १०० किलोमीटरहून अधिक अंतराचे सायकल ट्रॅक उभारलेले आहेत. शहरात जवळपास प्रमुख रस्त्यांवर हे ट्रॅक विखुरलेले आहेत. मात्र, केवळ ते एकमेकांशी जोडले गेलेले नसल्याने तसेच त्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडे कोणत्याही ठोस योजना अथवा धोरण नसल्याने हे सायकल ट्रॅक पडून आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून शहरासाठी सर्वंकष सायकल आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्तावही पाठविण्यात आला. त्या माध्यमातून केंद्राच्या नगर विकास मंत्रालयाने या योजनेसाठी ८० टक्के निधी देण्याची तयारीही दर्शवली होती. त्यानुसार, महापालिकेने नागरिकांकडून सूचना मागवून त्याचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागाराची निविदा प्रक्रियेद्वारे नेमणूक करण्यात आली असून, त्यासाठी येणाऱ्या सव्वा कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर १७ आॅक्टोबर रोजी ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)सायकल ट्रॅक वापरले जावेत, असे महापालिकेलाच वाटत नाही. त्यामुळे प्रस्ताव कोणत्याही कारणास्तव थांबला असला, तरी नागरिकांना शहरातील सायकल ट्रॅक वापरण्यासाठी हवे आहेत. पालिकेला ही योजना नको असेल, तर दुसरी तयार करावी; पण आम्हाला सायकल सायकल ट्रॅक मिळावेत. ते वापरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, अशी आमची भूमिका आहे.- रणजित गाडगीळ, परिसर संस्था