शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई मुलांना शाळेबाहेर ठेवण्यासाठी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2015 00:42 IST

शाळेचा पहिल्या दिवस असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणात शाळेत घेऊन जात असताना दिसत होते.

पुणे : शाळेचा पहिल्या दिवस असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणात शाळेत घेऊन जात असताना दिसत होते. मात्र, शिक्षण विभागाने घालून ठेवलेल्या आरटीई प्रवेशामुळे शहरातील हजारो बालकांवर सोमवारी घरी बसण्याची वेळ आली. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मात्र, आज याच कायद्यामुळे आमची मुले शाळेबाहेर राहिली आहेत, अशा संतप्त भावना पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राविण्यात आली. विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक व प्राथमिक वर्गात प्रवेश देण्यात आला. मात्र, राज्य शासनाने प्रवेशप्रक्रिया सुरू असताना आरटीई प्रवेश केवळ पहिलीसाठी लागू राहतील, असा अध्यादेश प्रसिद्ध केला. त्यामुळे सुरू असलेली प्रवेशप्रक्रिया विस्कळीत झाली. न्यायालयात याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. अवंतिका सोनवणे यांच्यासह सुमारे ४० पालकांना कोथरूड येथील न्यू इंडिया स्कूलमध्ये प्रवेश मिळाला आहे. मात्र, ही सर्व मुले आरटीई प्रवेशापासून वंचित राहिली आहेत. अवंतिका सोनवणे म्हणाल्या, ‘‘शिक्षण विभागाने आमच्या मुलांना आरटीईअंतर्गत न्यू इंडिया स्कूलमध्ये पहिली व पूर्वप्राथमिक वर्गासाठी प्रवेश दिला; मात्र एकाही विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आलेला नाही. दोन ते अडीच महिन्यांपासून आम्ही शाळेचे खेटे घालत आहोत.’’ (प्रतिनिधी)- ‘आज शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे किमान आज तरी आमच्या मुलांना प्रवेश मिळेल का? याबाबत विचारणा करण्यासाठी काही पालक शाळेत गेलो होतो. मात्र, प्रवेशाबाबत शाळेकडून नकार कळविण्यात आला. सोमवारी आमच्याशेजारी राहणारी मुले शाळेत जात होती; परंतु आमची मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. त्यामुळे मन खिन्न झाले,’ अशा भावना व्यक्त करून सोनवणे म्हणाल्या, ‘‘माझ्या मुलाला आरटीईनुसार न्यू इंडिया स्कूलमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यामुळे मी विश्वनिर्मल प्रायमरी स्कूलमधून मुलाचा प्रवेश रद्द केला. मात्र, आता या शाळेतही माझ्या मुलाला प्रवेश मिळत नाही.त्यामुळे आरटीईमुळे मुलांना शिक्षणाचा हक्क मिळतो की ते प्रवेशापासून वंचित ठेवले जातात, हेच समजत नाही.