शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काहीही करून बिबटे जेरबंद करा

By admin | Updated: May 8, 2017 02:20 IST

वढू येथे गेले आठवडाभर बिबट्या आला रेची दहशत असून शनिवारी केलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याने

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा : वढू येथे गेले आठवडाभर बिबट्या आला रेची दहशत असून शनिवारी केलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याने आता परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत सर्व बिबटे जेरबंद करा, अशी मागणी होत असून वनविभागही खडबडून जागा  झाला आहे. वढू बुद्रुक येथील चाफावाडावस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले रतन शंकर भंडारे या वृद्ध शेतकऱ्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वीही बिबट्याने येथे हल्ले केले असून प्रत्यक्ष पाहिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. असे असताना बिबटे पकडले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. जखमी भंडारे यांची जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी भेट घेऊन परिथितीचा आढावा घेतला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत यापुढे बिबट्याच्या हल्ल्याच्या दुर्दैवी घटना घडल्यास त्यास वनविभागच जबाबदार राहणार असल्याचे सुनावले. कोणत्याही परिस्थितीत बिबट्या जेरबंद झालाच पाहिजे, असा सज्जड दम दिल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीही बिबट्या पकडण्यासाठी विविध पर्याय राबविणार असल्याचे सांगितले.या वेळी वनपाल बी. आर. वाव्हळ यांनी सांगितले, ‘वढू परिसरात तीन पिंजरे लावले असून पिंजऱ्यात बिबट्या अडकण्यासाठी शेळी ठेवूनही बिबट्या काही पिंजरा लावलेल्या ठिकाणी आला नसून दोन दिवसांनी पिंजऱ्याचे ठिकाण बदलून बिबट्या पकडण्यासाठी विविध प्रयोग राबवणार असल्याचे वनपाल वाव्हळ यांनी सांगितले. प्रफुल्ल शिवले : नागरिकांच्या जिवाशी खेळू नकागेल्या सहा महिन्यांपासून परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. वनविभागाने पिंजरा लावण्यापलीकडे कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. एका महिन्यात दोन ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला केला असल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळू नका, असे सांगत कोणत्याही परिस्थितीत बिबट्या पकडण्याची मागणी माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांनी केली.जखमीला पाहण्यासाठी पोलीस गेलेच नाहीतबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी रतन भंडारे जखमी झाले असून बिबट्या या परिसरात धुमाकूळ घालत असूनही शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व बीट अंमलदार कांबळे यांनी घटनास्थळी साधी भेटही न दिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत रमेश गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बीट अंमलदार घटनास्थळी गेले असल्याचे सांगितले.