शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

महापालिकेचा गळा घोटू नका

By admin | Updated: June 6, 2014 23:43 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करून राज्य शासन महापालिकेचे आर्थिक स्वालंबन हिरावून घेत आहे.

पुणो : स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करून राज्य शासन महापालिकेचे आर्थिक स्वालंबन हिरावून घेत आहे. व्यापा:यांच्या हितासाठी शासनाने हा निर्णय घेतल्यास वाढत्या शहरास सेवा आणि सुविधाही पुरविण्याच्या महापालिकेच्या मूलभूत कामावरच आघात होईल. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेऊन महापालिकेचा गळा घोटू नये, अन्यथा कामगार संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा पुणो महापालिका कामगार युनियनने दिला आहे. 
राज्य शासनाने एलबीटी रद्द करू नये या मागणीसाठी संघटनेने शुक्रवारी महापालिका भवनासमोर सभा 
घेण्यात आली. महापालिकेच्या अधिका:यांसह मोठय़ा संख्येने कामगार उपस्थित होते. 
व्यापा:यांच्या मागणीनुसार, अवघ्या वर्षभरापूर्वी जकात रद्द करून एलबीटी लागू करण्याचा निर्णय राज्य शाससने घेतला होता. मात्र, या कर प्रणालीसही व्यापा:यांनी 
विरोध केल्याने आता एलबीटी रद्द करून इतर कर प्रणाली लागू करण्याचा विचार राज्य शासनाने गांभीर्याने सुरू केला आहे. 
मात्र, या निर्णयामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईस येणार 
असून, त्याचा थेट परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या 
भूमिकेचा निषेध करण्यासाठी तसेच कामगार युनियनची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज कामगार संघटनांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. 
या वेळी राज्य शासन तसेच  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केवळ व्यापा:यांचीच बाजू घेत असून, महापालिकेचे कर्मचारी, शहर विकास, पालिकेस पुरवाव्या लागत असलेल्या सुविधा यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत निर्णय घेतल्यास कोणत्याही टोकार्पयत जाऊन त्यास विरोध करण्याचा निर्णय संघटनानी या सभेत घेतला. 
संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विकास देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. 
ज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता 
मनोहर, महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, एलबीटी विभागप्रमुख विकास कानडे, घोले 
रस्ता क्षेत्रीय अधिकारी माधव जगताप, युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड उदय भट, एल आय युनियनचे तिवारी, 
लाल निशाणचे कॉम्रेड केरकर, युनियनचे कार्याध्यक्ष प्रकाश 
चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत गमरे उपस्थित होते. (प्रतिनिधी) 
 
4एलबीटी रद्द करू नये या मागणीसाठी लाखो कामगारांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, चव्हाण यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात येणार आहे. तसेच, याबाबत संघटनेकडून जनजागृतीसाठी कार्यक्रमही घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.