शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखांवर मालमत्ता कराविना

By admin | Updated: September 7, 2016 01:54 IST

शहरातील ५ लाखांपेक्षा अधिक इमारतींना महापालिकेचा करच लावला जात नाही. शहराच्या भोवताली असणाऱ्या उपनगरांमध्ये अशा सर्वाधिक इमारती असून, त्यातील अनेक इमारतींवर अनधिकृत बार आहेत

पुणे : शहरातील ५ लाखांपेक्षा अधिक इमारतींना महापालिकेचा करच लावला जात नाही. शहराच्या भोवताली असणाऱ्या उपनगरांमध्ये अशा सर्वाधिक इमारती असून, त्यातील अनेक इमारतींवर अनधिकृत बार आहेत. पालिकेचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान यात होत आहे. यातील काही इमारतींना राजकीय पाठिंबा असल्याची चर्चा आहे.महापालिकेचे सुमारे ८ लाख ५० हजार करदाते आहेत. त्यांच्याकडून पालिकेने मागील वर्षात १ हजार २०० कोटी रूपये मिळकत कर म्हणून वसूल केले. पालिका प्रशासनाकडून याचा नेहमीच डांगोरा पिटला जातो. मात्र, सुमारे ५ लाख मिळकतींना करच लावला जात नाही. त्या इमारती वास्तवात आहेत, मात्र त्यांची पालिकेच्या दप्तरी नोंदच नाही. त्यातील काही इमारती गेल्या १० वर्षांहून अधिक काळ वापरात आहेत. इतकी वर्षे त्यांना पालिकेकडून पाच पैशांचाही कर लावला गेलेला नाही. काही इमारतींनी त्यांच्या मूळ डिझाईनमध्ये बदल केला. हा बदल फक्त गॅलरी काढणे किंवा ती बंद करणे यापुरताच मर्यादित नाही, तर टेरेसवर परमीट रूम सुरू करण्यापर्यंत आहे. त्यासाठीचा परवाना वगैरे घेतला जातो. मात्र, पालिकेला कर देणे टाळले जाते.पालिकेच्या मिळकत कर विभागाला या मालमत्तांची माहितीच नाही. माहिती असली तरी त्यांचे क्षेत्रफळ मोजून त्यांना घरपट्टीचे बिल पाठवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच त्यांच्याकडे नाही. या विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी अशा मालमत्ताधारकांसाठी अभय योजना सुरू केली. त्यानुसार ज्यांना कर लावला जात नाही, त्यांनी स्वत:हून पालिकेशी संपर्क साधल्यास त्यांच्या मालमत्तेची मोजणी करून त्याला कर लावला जाईल. बदल्यात त्यांना दंड केला जाणार नाही. या योजनेला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. ५ लाखांपैकी अवघ्या ५०० जणांनी आतापर्यंत यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता मिळकत कर विभागाने आता अशा मालमत्तांवर बडगा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३ सहायक कर आकारणी प्रमुख, २४ विभागीय निरीक्षक, ६० पेठ निरीक्षक यांची स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली असून, त्यांना शहराचे विभाग नेमून देण्यात आले आहेत. या विभागाच्या कारवाईत एकएक प्रकार निदर्शनास येऊ लागले आहेत. कल्याणीनगर येथील सेरेब्रम बिल्डिंगमधील ८व्या मजल्यावर सुरू असलेले दोन विनापरवाना बारच्या मालकांना दंड ठोठावण्यात आला. विमाननगर येथील एका इमारतीच्या ६व्या मजल्यावर रूड नावाचा असा मोठा बार होता. या सर्वांवर ३ पट दंड आकारणी करण्यात आली.सहायक कर आकारणी प्रमुख वैभव कडलख, चेतन कबाडे तसेच त्यात्या विभागातील पेठ निरीक्षकांकडून ही कारवाई करण्यात आली.