शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कारखान्यावर पाऊल ठेवू नका

By admin | Updated: March 22, 2015 23:04 IST

अजित पवार तुम्ही कारखान्याचे सभासद नाही त्यामुळे कारखान्यावर पाऊल ठेऊ नये तुम्हाला तो अधिकार नाही

सोमेश्वरनगर : अजित पवार तुम्ही कारखान्याचे सभासद नाही त्यामुळे कारखान्यावर पाऊल ठेऊ नये तुम्हाला तो अधिकार नाही. कारखाना बिनविरोध करायचा असेल तर कारखान्यावरील ३१९ कोटी कर्ज भरा, शिक्षण संस्था कारखान्याच्या ताब्यात द्या. मी माझ्याकडचे काकडे कॉलेज २४ तासात कारखान्याकडे देतो, असे आव्हान शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे यांनी दिले.निंबुत (ता. बारामती) येथे शेतकरी कृती समिती पुरस्कृत सोमेश्वर जनशक्ती पॅनेलच्या प्राचाराचा नारळ फोडताना काकडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदूकाका जगताप होते. यावेळी सोपानकाका बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, दिलीप खैरे, नंदकुमार शिंदे, दिग्वीजय जगताप, प्रविण जगताप, जगन्नाथ तावरे आदी मान्यवर उपस्थीत होते. यावेळी संजय जगताप यांचे भाषण झाले. कार्यक्रमात दिलीप खैरे, सौरभ काकडे, राहुल खोमणे, सुशांत सोरटे, भाऊसाहेब भोसले, रमणिक कोठाडीया यांनी मनोगते व्यकत केली. सभेत मदन काकडे पक्षासाठी यांनी अर्थिक मदतीचे आवाहन केले. सूत्रसंचालन मदन काकडे यांनी केले. तर आभार कल्याण भगत यांनी मानले. यावेळी परिसरातील शेतकरी, कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)नेते मंडळीनी सहकाराची वाट लावली. यांनी तयार केलेली ९७ वी घटना दुरूस्तीमधील कायदे भंयकर असून हे सहकार संपविण्याचे कारस्थान आहे. माजी मंत्री पवार म्हणतात ५ वर्ष सत्ता द्या. कर्ज फेडले नाही, तर विधासभेला उभा राहणार नाही. विधानसभा आणि कारखान्याचा काय संबंध, ९२ साली कारखान्यावर कर्ज होते पण आतासारखा भष्टाचार नव्हता. त्यावेळी साखर गोदामामध्ये पडून होती. साखरेच्या पोत्यावर उचल देणारी बँक ही पवारांच्या ताब्यात होती त्यामुळे पोत्यावर कर्ज वेळेत न मिळाल्याने कामागरांचे आणि सभासदांची देणी थकली, हे कटू सत्य आहे. त्याची शिक्षा आता आम्ही २० वर्ष भोगलीय. कर्ज व भष्ट्राचार मान्य केला. पक्षाच्या अधिवेशनाला कारखान्याच्या गाडया, गडी आणि पैसा वापरला जातो. ते या कारखान्याचे सभासद नाहीत. तुमचा काहीही संबंध नाही त्यामुळे तुम्ही कारखान्यावर पाऊल ठेऊ नये. - सतीश काकडे, शेतकरी कृती समितीचे नेते