शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

बांधकाम न पाडल्यास फौजदारी करू

By admin | Updated: September 29, 2016 06:02 IST

महापालिका सभेतील प्रश्नोत्तराच्या कालखंडात राष्ट्रवादीतील काही नगरसेवक आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी संभाजीनगर साई उद्यानातील अवैध बांधकामाच्या मुद्द्यावरून

पिंपरी : महापालिका सभेतील प्रश्नोत्तराच्या कालखंडात राष्ट्रवादीतील काही नगरसेवक आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी संभाजीनगर साई उद्यानातील अवैध बांधकामाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचा पोलखोल केला. सामान्य नागरिकांची अवैध बांधकामे पाडता, मग पालिकेच्या खर्चाने साई उद्यानात अवैध बांधकाम कसे काय उभे राहते? हा न्यायालयाचा अवमान नव्हे का? जोवर महापालिकेने केलेल्या अवैध बांधकांमांवर कारवाई होत नाही, तोवर शहरातील एकही बांधकाम पाडू देणार नाही. आयुक्तांनी कारवाई न केल्यास फौजदारी दाखल करू, असा इशाराही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांनी केला. सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर शकुंतला धराडे होत्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी उद्यानामधील अवैध बांधकामांबाबत सभागृहाला प्रश्न विचारले होते. त्याला प्रशासनाने दिलेल्या उत्तरावर सुमारे दोन तास चर्चा झाली. साने यांनी वृत्तपत्रांची कात्रणे, शासकीय कार्यालयांची उत्तरे, कायदेशीर आधार असणारी हरित लवादाची कागदपत्रे सादर करून सत्तारूढ पक्षनेत्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला. साने म्हणाले, ‘‘माहिती लपविण्याचे काम प्रशासन करीत आहे. एकीकडे सर्वसामान्यांच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरविले जात आहे. दुसरीकडे जनतेच्या करांच्या पैशांतून अवैध बांधकाम उभारले जात आहे. ठरावीक पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची ही मिलीभगत आहे. चोऱ्या लपविण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रश्नाबाबत एमआयडीसीनेही संबंधित बांधकामास कोणतीही परवागनी दिली नसल्याचे सांगितले आहे. विनापरवाना बांधकामकेल्यास किंवा त्याला पाठिंबा दिल्यास संबंधित नगरसेवकाचे पद रद्द होते. तोच नियम अधिकाऱ्यांनाही लागू आहे. त्यामुळे साई उद्यानातील अवैध बांधकामात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. फौजदारी दाखल करू. जोपर्यंत संबंधित बांधकाम पाडले जात नाही, तोपर्यंत शहरातील अन्य अनधिकृत बांधकामे पाडू दिली जाणार नाहीत. अन्यथा, माझ्याशी गाठ आहे.’’(प्रतिनिधी)अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा का नाही?शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘‘सामान्यांनी विनापरवाना बांधकाम केल्यासत्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो. महापालिका प्रशासनाने अवैध बांधकाम केल्यास संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा का दाखल केला जातनाही? रेड झोनमध्ये नागरी सुविधा पुरविण्याऐवजी अवैध बांधकामे पाडली जातात. इथे मात्र महापालिकेनेच स्वखर्चाने उद्यानात अवैध बांधकाम केले आहे.’’ ‘हम तो डुबेंगे, लेकीन पार्टी को लेकर डुबेगे’सभावृत्तांतात ती उपसूचना बेकायदेशीरपणे घुसडण्यात आली. सत्तारूढ पक्षनेत्यांच्या लाडापोटी, हट्टापोटी अवैध बांधकाम वाचविण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर शहरातील एकाही विनापरवाना बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना नाही. याचा खुलासा करायला हवा. मंगला कदम यांचा मनमानी कारभार म्हणजे ‘हम तो डुबेंगे सनम, लेकीन पार्टी को लेकर डुबेगे’ असा टोलाही उबाळे यांनी मारला.सत्ताधारी विरोधकांत जुंपलीउबाळे यांनी गणसंख्येचा मुद्दा मांडला. शमीम पठाण यांनी बोलण्यासाठी परवानगी मागितल्याने महापौरांनी बोलण्याची संधी दिली. त्याच वेळी ‘मला बालायचेय,’ असे सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या. मात्र, शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या आसनाजवळ गेले आणि गणसंख्येअभावी ही बैठक तहकूब करावी, अशी मागणी केली. या वेळी सीमा सावळे, उबाळे, कदम, योगेश बहल, पठाण यांच्यात वाक्युद्ध झाले. शेवटी महापौरांनी सभा तहकूब ठेवली.