शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विसंगत आदेशांची अंमलबजावणी नको

By admin | Updated: March 8, 2016 01:34 IST

मुख्य सभेने घेतलेले निर्णय जर राज्य शासनाचे विविध अधिनियम, नियम, धोरणे इत्यादीशी विसंगत असल्यास त्या आदेशांची अंमलबजावणी महापालिका आयुक्तांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नये

पुणे : मुख्य सभेने घेतलेले निर्णय जर राज्य शासनाचे विविध अधिनियम, नियम, धोरणे इत्यादीशी विसंगत असल्यास त्या आदेशांची अंमलबजावणी महापालिका आयुक्तांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये करू नये. अशा ठरावांची आयुक्तांनी अंमलबजावणी केल्यास व त्यामुळे काही कायदेशीर प्रश्न उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आयुक्तांवर असेल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकांच्या मुख्य सभेकडून अनेकदा बहुमताच्या जोरावर कायद्याशी विसंगत, त्यांना हानी पोहोचेल असे निर्णय घेतले जात आहेत. सध्या असे ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्याची तरतूद महापालिका कायद्यामध्ये आहे. मात्र ठराव विखंडित करण्याच्या प्रस्तावावर निर्णय देण्यास राज्य शासनाकडून उशीर झाल्यास तोपर्यंतच्या कालावधीमध्ये आयुक्तांना त्या ठरावाची अंमलबजावणी करावी लागते. त्यातून अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी अशा निर्णयांची अंमलबजावणीच करू नये असे निर्देश राज्य शासनाने काढले आहे. याबाबतचे परिपत्रक नगरसचिव कार्यालयाकडून २८ फेब्रुवारी २०१६ रोजी काढण्यात आले आहे.स्मार्ट सिटी योजनेच्या आराखड्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या मुख्य सभेने एक महिन्यासाठी पुढे ढकलला होता, मात्र त्यामुळे स्मार्ट सिटीच्या स्पर्धेसाठी प्रस्ताव पाठविण्याची मुदत उलटून जाणार होती. त्यामुळे पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी थेट राज्य शासनाकडे धाव घेऊन एका दिवसामध्ये मुख्य सभेचा हा निर्णय विखंिडत करून आणला होता. या निर्णयामुळे आयुक्तांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.