शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची थडगी रचून विकास नको : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:30 IST

शासनाने विकासाचे मनोरे जरूर रचावेत, आमचा विकासाला कधीही विरोध राहणार नाही; मात्र शेतक-यांची थडगी रचून कोणालाही विकासाचे मनोरे आम्ही बांधू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोथळे येथे दिला आहे.

जेजुरी : शासनाने विकासाचे मनोरे जरूर रचावेत, आमचा विकासाला कधीही विरोध राहणार नाही; मात्र शेतक-यांची थडगी रचून कोणालाही विकासाचे मनोरे आम्ही बांधू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कोथळे येथे दिला आहे.येथे जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात येणाºया कोथळे ते जेजुरी या ८६ लाख रुपये खर्चाच्या कामाचा, साठवण बंधाºयाच्या कामाचा शुभारंभ व ज्ञानरंजन वाचनालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राजू शेट्टी, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, माजी अध्यक्ष प्रदीप कंद, मनसेचे नेते बाबा जाधवराव, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. धनंजय भोईटे, संभाजी काळाणे, सुनील आस्वलीकर, गंगाराम जगदाळे, बाळासाहेब धाबेकर आदी उपस्थित होते. या वेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील पारगाव व सात गावांना उद्ध्वस्त करून तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक बाधित शेतकºयांनी याबाबत आपणास माहिती दिली आहे. शेतकºयांची संमती असेल तर कोणीही विमानतळास विरोध करणार नाही; मात्र दहशत वा फसवाफसवी करून विमानतळ होऊ देणार नाही. विरोधासाठी सर्वांच्या पुढे आपण असू. विमानतळाला एक इंचही जमीन मिळणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय शासनाचा पटसंख्येअभावी शाळा बंद करून बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे शासकीय षड्यंत्र असून ते हाणून पाडले पाहिजे, असेही ते म्हणाले. एका सहीने येणारे गुंजवणीचे पाणी गेले कुठे, असे आरोप करीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी राज्यमंत्री शिवतारे यांच्यावर टीका केली. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी जिल्ह्यातील एकही शाळा पतसंख्येअभावी बंद पडणार नसल्याची ग्वाही दिली. बाबा जाधवराव यांनी विमानतळाला विरोध करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकºयांच्या बरोबर यावे, असे आवाहन केले.नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी स्वागत केले. ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी प्रास्ताविक केले, संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. धनंजय भोईटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी