शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी आगारामध्ये डिझेल घोटाळा?

By admin | Updated: April 9, 2017 04:44 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) हडपसर आगारामध्ये वैधमापन शास्त्र विभागाकडून डिझेलचा एक टँकर सील करण्यात आला. या टँकरमध्ये सुमारे ७८६ लिटर

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) हडपसर आगारामध्ये वैधमापन शास्त्र विभागाकडून डिझेलचा एक टँकर सील करण्यात आला. या टँकरमध्ये सुमारे ७८६ लिटर डिझेल कमी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रकार आधीपासून सुरू असल्याची चर्चा असून डिझेलमध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.‘पीएमपी’कडून दीड-दोन वर्षांपूर्वीपासून एका खासगी कंपनीकडून बससाठी डिझेलची खरेदी केली जात आहे. सर्व आगारांना याच कंपनीकडून डिझेलचा पुरवठा केला जातो. या कंपनीकडून टँकरद्वारे पीएमपीला डिझेल पुरविले जात आहे. शुक्रवारी हडपसर आगारामध्ये एक टँकर डिझेल घेऊन आल्यानंतर तेथील ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना डिझेल कमी असल्याची शंका आली. त्यांनी मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. तसेच वैधमापनशास्त्र विभागाशीही संपर्क साधण्यात आला. वैधमापनच्या अधिकाऱ्यांनी डिझेलची मोजणी केली असता बारा हजार लिटरच्या या टँकरमध्ये ७८६.९४ लिटर डिझेल कमी आढळून आले. त्यामुळे हा टँकर पंचनामा करून सील करण्यात आला आहे. टँकरच्या आतमध्ये काही बदल करण्यात आला आहे का, याचाही पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून कंपनी व टँकर चालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.खरेदी-वापराची माहिती संकलित करणार टँकरमधून पीएमपीला यापूर्वीही कमी डिझेल मिळाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे डिझेलमध्ये घोटाळा असल्याची चर्चा सुरू झाली असून, याबाबत आता पीएमपी प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. आतापर्यंत झालेली डिझेल खरेदी व वापर याची सर्व माहिती संकलित केली जाणार असल्याचे समजते.