शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आवर्तनामुळे दिलासा मिळणार : वळसे-पाटील

By admin | Updated: May 5, 2017 02:09 IST

कुकडी नदीला पाणी सोडण्याचा निर्णय आज झाल्यामुळे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या पारनेर, जुन्नर, शिरूर तालुक्यातील

टाकळी हाजी : कुकडी नदीला पाणी सोडण्याचा निर्णय आज झाल्यामुळे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या पारनेर, जुन्नर, शिरूर तालुक्यातील जनतेला दिलासा मिळणार असल्याची माहिती विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली.आज कुकडी व चासकमान प्रकल्प पाणीप्रश्नाविषयी पुणे सिंचन भवनात बैठक झाली. या वेळी विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हाधिकारी सौरभ राव, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता ए. डी. कुलकर्णी, चासकमानचे अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले, शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप, भीमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम उपस्थित होते. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर उपस्थित होते. कुकडी नदीला गेल्या दोन महिन्यांपासून पाणी नसल्यामुळे जुन्नर, शिरूर, पारनेर तालुक्यातील नदीकाठावरील ४७ ते ५० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. डाळिंब बागा, चारा पिके जळून गेले असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. मळगंगा देवी यात्रेलाही पाणी आले नाही. त्यामुळे पाण्यावाचून भाविक-भक्तांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. शिरूर माजी आमदार  पोपटराव गावडे म्हणाले की, विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पाण्यासाठी  चार ते पाच वेळा बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे दि. ७ ला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कुकडी कालव्यामधून हे पाणी नदीला सोडण्यात येणार आहे.  (वार्ताहर)