शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कृत्रिम अवयवातून दिव्यांग होणार धडधाकट

By admin | Updated: January 11, 2017 02:05 IST

बारामती शहरात दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम अवयववाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत १०६ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे बळ देण्यात आले.

बारामती : बारामती शहरात दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम अवयववाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत १०६ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे बळ देण्यात आले. त्यामुळे हे दिव्यांगदेखील आता धडधाकटपणे आयुष्य जगू शकणार आहेत.बारामती येथील कोयनोनिया फाउंडेशन आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. रविवारी (दि ८) येथील बालनिरीक्षण गृह येथे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते अवयवांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग व्यक्तिंनी खचुन न जाता एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणाऱ्या यशस्वींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन नगराध्यक्षा तावरे यांनी केले. यावेळी चर्च आॅफ ख्राईस्ट, पुनर्स्थापित ख्रिस्ती मंडळाचे अध्यक्ष डॉ नितीशकुमार वाघमोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी इम्तीयाज शिकीलकर, संभाजी होळकर, जयसिंग देशमुख, अनघा जगताप, अमर धुमाळ, राहुल वाबळे, फैय्याज शेख आदी उपस्थित होते.बारामती येथे झालेल्या शिबिरात बारामती शहर, तालुका, अहमदनगर, जुन्नर, सासवड, श्रीगोंदा, औरंगाबाद येथील दिव्यांग व्यक्तिंना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. ऐपत नसणाऱ्या सामान्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे या व्यक्ति देखील इतरांप्रमाणे धडधाकट आयुष्य जगु शकतात. शिवाय दोघा जणांना व्हील चेअर देखील देण्यात आल्या. (प्रतिनिधी)दिव्यांगांना वाटप : २०१२पासून उपक्रम23 आॅक्टोबर रोजी दिव्यांग व्यक्तिंसाठी शिबीर राबविण्यात आले. यावेळी दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक कृत्रिम अवयवाचे माप घेण्यात आले. त्यानुसार बनविलेल्या अवयवांचे नुकतेच वाटप करण्यात आले.2012 पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एकुण २०९ जणांना आजपर्यंत कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले.  याबाबत कोयनोनिया फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव पारधे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, दिव्यांग व्यक्तिंना सक्षमपणे चांगले जीवन जगता यावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. एका दिव्यांग व्यक्तिसाठी जवळपास १५ हजार रुपये खर्च येतो. बहुतांश सर्वसामान्यांना अनेकदा हा खर्च करणे शक्य होत नाही. त्यांना इनलॅक बुधरानी हॉस्पिटलच्या माध्यमातुन हे कृत्रिम अवयव मोफत वाटप करण्यात येतात.