शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील दुभाजक तोडले

By admin | Updated: April 6, 2016 01:25 IST

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर कापूरव्होळनजीक हरिश्चंद्री व वर्वे गावच्या हद्दीतील इंडियन आॅइल कंपनीच्या पेट्रोल पंपासमोरच्या मुख्य रस्त्याच्या सुरक्षिततेचा भाग तोडून

कापूरव्होळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर कापूरव्होळनजीक हरिश्चंद्री व वर्वे गावच्या हद्दीतील इंडियन आॅइल कंपनीच्या पेट्रोल पंपासमोरच्या मुख्य रस्त्याच्या सुरक्षिततेचा भाग तोडून त्याचा अवैध दुभाजक संबंधित पेट्रोल पंपचालक-मालक यांनी तयार केला आहे. हरिश्चंद्री येथे पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहने, तर वर्वे येथे साताराकडून पुण्याकडे जाताना पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी या पंपावर अचानक वाहने वळतात व याच वेळेस पुण्याहून साताऱ्याकडे जाणारी वाहनेही सर्व्हिस रोड; तसेच मुख्य मार्गावरून वेगाने जात असतात, तर याच वेळी मुख्य रस्त्यावरून इंडियन आॅइलच्या पंपावर इंधन भरण्यासाठी दुचाकीस्वारही अचानक वळतात. त्यामुळे या ठिकाणी छोटे-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती हरिश्चंद्री व वर्वे गावच्या नागरिकांनी प्रतिनिधीला दिली.याबाबत प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, इंडियन आॅइल कंपनीच्या पेट्रोल पंपाचे चालक-मालक यांनी मुख्य रस्त्याचे संरक्षक कठडे जवळ जवळ शंभर फुटांपेक्षाही अधिक तोडलेले दिसले. पंपाचे मालक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तोडलेले दुभाजक हे चालक-मालकांच्या फायद्याचा असून, शासनाच्या नियमानुसार अवैध बेकायदेशीर असल्याचे म्हणने वर्वे व हरिश्चंद्रीच्या नागरिकांचे म्हणणे आहे.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शासन लाखोंचा खर्च करून महामार्गाच्या दोन्ही बाजूस सिमेंट काँक्रीटचे कठडे उभारत आहेत, तर पावसाचे पाणी रस्त्यावर येऊ नये ते बाजूने वाहून जाण्यासाठी सुरक्षित गटारे उभारत आहेत. परंतु, वैयक्तिक स्वार्थासाठी मनमानी पद्धतीने मोठे व्यावसायिक महामार्गावरील बाजूचे कठडे दुभाजक तोडून महामार्गावरील प्रवाशांसाठी धोकादायक परिस्थिती तयार करतात. तसेच, मार्गावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेली गटारे माती व मुरूम टाकून बुजवतात. त्यामुळे पावसाळ्यात जोराचा पाऊस झाल्यावर, याच गटाराचे पाणी या बुजवलेल्या ठिकाणाहून मुख्य रस्त्यावर येणार असून, महामार्गावर अपघात होणार आहेत. काही वर्षांपूर्वी शिंदेवाडी, ता.भोर येथील कात्रज घाटानजीक पावसाच्या पाण्यात मायलेकी वाहून गेल्याची घटना घडली होती. त्याचीच परत पुनरावृत्ती होणार काय, आणि अशा घटना घडल्यावरच शासन पुन्हा जागे होणार काय, असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. अशा प्रकारे हे व्यावसायिक नफा कमविण्यासाठी प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत, असे वाहनचालकांनी सांगितले. (वार्ताहर)