शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेणार

By admin | Updated: February 27, 2016 04:32 IST

राज्यात यंदा टंचाईची झळ अधिक असल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ ही दोन वर्षे बंद असलेली योजना शासनाने पुन्हा सुरू केली असून, त्यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेण्यात येणार

पुणे : राज्यात यंदा टंचाईची झळ अधिक असल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ ही दोन वर्षे बंद असलेली योजना शासनाने पुन्हा सुरू केली असून, त्यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी काटकर यांनी सांगितले.या वर्षी जिल्ह्यात फेबु्रवारीतच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. आताच टँकर पन्नाशीवर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने नुकताच ४० कोटी ९१ लाखांचा टंचाई आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीही दिली आहे. यातून नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळपाणी योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहीर खोलीकरण व गाळ काढणे आदी कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यात आता शासनाच्या कृषी विभागातर्फे टंचाईग्रस्त भागात शेतकऱ्याकडे स्वत:ची सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून मागेल त्याला शेततळे देण्यात येईल. यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)यासाठी आवश्यक पात्रतामदत व पुनर्वसन विभागाकडून निधी उपलब्ध होऊन सदर योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी, तसेच शेततळ्याकरिता निवडलेली जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे, सामुदायिक शेततळे, बोडी याचा लाभ घेतलेला नसावा. दारिद्र्यरेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना प्रथम प्राधान्य. प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. ४५ दिवसांत अर्ज सादर करणे. गावात मागील ५ वर्षांत एक वर्ष तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेली असावी.आॅनलाईन प्रक्रियावैयक्तिक लाभाच्या योजना ज्या विभागातर्फे दिल्या जातात, ते तालुका पातळीवरून याद्या करून त्याचे प्रस्ताव घेतात. मात्र, यात अधिकारी, पदाधिकारी यांच्या जवळच्यांनाच फायदा होता. पण, शेततळ्याची मागणी आॅनलाई असून प्रथम नोंद करणाऱ्यास प्राधान्य आहे.https://aaplesarkar.maharashtra.gov.in संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज भरायचा आहे. मूळ अर्ज भरून स्वत:च्या स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवावीत. ही प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल.