शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात जिल्हा कुपोषणमुक्त!

By admin | Updated: December 31, 2015 04:06 IST

मावळ तालुक्यात सुरू केलेल्या ‘ग्राम बालविकास केंद्रा’ला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, आता जिल्हाभर हा उपक्रम सुरू करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविले आहे. मार्चअखेरपर्यंत कुपोषणमुक्त

पुणे : मावळ तालुक्यात सुरू केलेल्या ‘ग्राम बालविकास केंद्रा’ला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर, आता जिल्हाभर हा उपक्रम सुरू करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरविले आहे. मार्चअखेरपर्यंत कुपोषणमुक्त जिल्हा करण्यात येणार आहे. २ हजार ८७ बालकांना तीन महिन्यांत सर्वसाधारण गटात आणणार आहेत.१२ जानेवारी रोजी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असून, मार्चअखेरपर्र्यत जिल्हा कुपोषण मुक्त करण्याचे ठरविले असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले. २१ आॅक्टोबर २०१५ रोजी पुणे जिल्हा परिषद, महिला व बाल कल्याण विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनाच्या वतीने कुपोषण निर्मूलन अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. त्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी वर्षात जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्र्धार केला होता. लायन्स क्लबच्या माध्यमातून मावळ तालुक्यात सर्वप्रथम हा उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यातील तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित २३९ बालकांपैकी २०५ बालकांना सर्वसाधारण गटात आणण्यात आले. ३४ बालके ही आजारी स्वरूपातील असून, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा देऊन त्यांनाही सर्वसाधारण गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात २ हजार ८७ बालके ही तीव्र व मध्यम कुपोषित आहेत. त्यात ३२७ बालके तीव्र, तर १ हजार ७६0 बालके ही मध्यम कुपोषित आहेत. यांना सर्वसाधारण गटात आणण्यासाठी आता विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी तालुका, बीट व अंगणवाडी स्तरावर ही योजना राबविण्यात येणार आहे. यात लायन्स क्लब पोषक अन्नाचा पुरवठा करणार असून, जिल्हा परिषद आरोग्य विभाग औषधे पुरविणार आहे. (प्रतिनिधी)लायन्स क्लबच्या माध्यमातून या उपक्रमाला यश येत असून, त्यांच्या माध्यमातून जिल्हाभर ग्राम बालविकास केंद्र करून जिल्हा लवकरच कुपोषण मुक्त करू. आपल्या गावातील एकही मूल कुपोषित राहू नये, यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा.- कांतिलाल उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी