बारामती : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बारामती शहरासह तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (दि. ३१) चक्का जाम आंदोलन करण्यात आले. खेड विभागातही ठिकठिकाणी आंदोलन झाले. बारामती येथे झालेल्या आंदोलनातील चार ठिकाणांहून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी मुबंई कलम ६८, ६९ अन्वये कायद्यानुसार ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. इंदापूर, फलटण, मोरगाव, माळेगाव, पाटस, भिगवण या मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कदम गुरुकुलसमोर चक्का जाम आंदोलन केले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात युवावर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. आंदोलनाला बावड्यात उत्स्फूर्त प्रतिसादात मिळाला. या वेळी इंदापूर-अकलूज आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.चाकण परिसरातील हजारो सकल मराठा बांधवांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम आंदोलन केले. आरक्षणासह विविध मागण्या असलेले फलक हातात घेऊन मराठा बांधवांनी दुपारी बाराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्ग रोखला. या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार न करता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी मूक मोर्चाबरोबरच ‘जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, कोपर्डी घटनेतील मुलीला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. परिसर दुमदुमला होता. आळेफाटा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शांततामय मार्गाने झालेल्या या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा आंदोलकांनी चौकात गोल मानवी रिंगण केले होते. घोडेगाव शहरातील महाराणी चौकातून मोर्चा निघाला व अहिल्यादेवी चौकात मंचर-भीमाशंकर रस्ता बंद करण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या चक्का जाम आंदोलन झाले. या वेळी उपस्थित जनसमुदायाकडून जोरदार घोषणाबाजी झाली. ...अन् आंदोलकांनी रस्ता क्षणार्धात केला मोकळागलांडवाडी नं. १ (ता. इंदापूर) येथील मालोजीराजे चौकात मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या वेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. मात्र रुग्णवाहिका महामार्गाच्या बाह्यवळण रस्त्याने या ठिकाणी येताच क्षणार्धात आंदोलक रस्त्यावरून बाजूला झाले व रुग्णवाहिकेला रस्ता खुला करून दिला.
जिल्हा थांबला...
By admin | Updated: February 1, 2017 04:39 IST