शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला गुरुवारी मिळाले लसींचे सर्वाधिक डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग मंदावला होता. लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग मंदावला होता. लोकसंख्येच्या तुलनेत लसींचे डोस मिळावे, अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर गुरुवारी जिल्ह्याला पहिल्यांदाच सव्वा दोन लाखांहून अधिक लसींचा पुरवठा झाला. यामध्ये २ लाख १२ हजार कोव्हिशिल्ड आणि १४ हजार ४०० कोव्हॅक्सिन लसींचा समावेश आहे. यापूर्वी २८ जुलैला २ लाख १२ हजार ५०० लसींचा पुरवठा झाला होता.

कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. तिसरी लाट रोखण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. लसींचा पुरवठा योग्य पद्धतीने झाल्यास लसीकरण वाढवणेही शक्य होणार आहे. याच दृष्टीने लसींचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात सध्या एका दिवशी ५० ते ६० हजार लसीकरण केले जात आहे. आजपर्यंत पाच वेळा जिल्ह्यातील लसीकरण एक लाखांहून जास्त झाले आहे.

गुरूवारी पुणे जिल्ह्याला मिळालेल्या २ लाख १२ हजार कोव्हीशिल्ड लसींपैकी पुणे ग्रामीणला ९१ हजार, पुणे शहराला ७४ हजार तर पिंपरी चिंचवडला ४७ हजार

लसी पुरवल्या जाणार आहेत.

जिल्ह्याला मिळालेल्या १४ हजार ४०० कोव्हॅक्सिन लसीपैकी पुणे ग्रामीणला ६ हजार २००, पुणे शहराला ५ हजार तर पिंपरी चिंचवडला ३ हजार २०० डोस दिले जाणार आहेत. --

----

पहिल्यांदाच ग्रामीण भागाला सर्वाधिक पुरवठा

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत लोकसंख्या जास्त असतानाही ग्रामीण भागावर लसवाटपात अन्याय होत होता. या बाबत लोकमतने वृत्त दिले होते. लसींचा पुरवठा कमी होत असल्याने ग्रामीण भागात लसीकरण क्षमता असतांनाही वेगाने करता येत नव्हते. सध्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधित असून ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण वेगाने करणे गरजेचे आहे. मात्र, अपुऱ्या लसपुरवठ्यामुळे ते शक्य होत नव्हते. मात्र, गुरुवारी मिळालेल्या सर्वाधिक लसपुरवठ्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवता येणार आहे.

काेट

ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात लसीकरण होत आहे, तिथे लसींचे जास्त डाेस देण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. जिल्ह्याला आठवड्यातून दोनदा डोस प्राप्त होणार आहेत. त्यातील एका खेपेस जास्त लसी तर दुसऱ्या वेळी छोटा साठा मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र लसीकरणाला गती येईल.

- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, आरोग्य विभाग

-----

कोव्हीशिल्ड

पुणे ग्रामीण : ९१०००

पुणे शहर : ७४०००

पिंपरी चिंचवड : ४७०००

----

एकूण : २ लाख १२ हजार

कोव्हॅकसिन

पुणे ग्रामीण : ६२००

पुणे शहर : ५०००

पिंपरी चिंचवड : ३२००

जिल्ह्यात आज पर्यंत झालेले लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत ७६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात ३६ लाख २ हजार ६२४ लाभार्थी आहेत. यातील १७ लाख ६ हजार ७५० जणांनी लस घेतली आहे. पुणे शहरात ३० लाख ९२७ लाभार्थी असून २१ लाख ८३ हजार २०९ जणांनी लस घेतली आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये१९ लाख ३६ हजार १५४ लाभार्थी असून त्यातील ८ लाख८७ हजार ३ ४४ जणांनी लस घेतली आहे. जिल्ह्यातील एकुण ८५ लाख ३९ हजार ७०६ लाभार्थ्यांपैकी ४७ लाख ७७ हजार ३०३ एवढ्या जणांनी लस घेतली असून ७६ टक्के लसीकरण झाले आहे.