शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला मिळाले लसींचे ५५ हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. मात्र, लसींच्या तुडवड्याअभावी ही मोहीम रखडली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. मात्र, लसींच्या तुडवड्याअभावी ही मोहीम रखडली होती. यामुळे अनेक केंद्रे बंद पडले होते. तर लसीकरण सुरू असलेल्या काही केंद्रांवरून लस कमी असल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागले होते. मात्र, मंगळवारी जिल्ह्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हक्सीनचे ५५ हजार नवीन लसीचे डोस देण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून हे डोस सर्व तालुक्‍यांना वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून बंद असलेले लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू होणार आहे. त्यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांनाही ही लस मिळणार आहे. ग्रामीण, नगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डातील लसीकरणासाठी ही लस वितरित केली जाणार आहे.

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून लसीच्या डोसची कमतरता असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आराेग्य विभागावर आली होती. दोन दिवसांत जिल्ह्याला जर लसीचे डोस मिळाले नसते तर अनेक केंद्रे बंद करण्याची वेळ आली असती. यामुळे लसीचे जास्तीत जास्त डोस मिळावे याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. अखेर मंगळवारी कोविशिल्ड लसीचे ४० हजार आणि कोव्हक्सीन लसीचे १५ हजार लसीचे डोस जिल्ह्याला मिळाले. या डोसमुळे काही प्रमाणात लसींचा तुटवडा भरून निघणार आहे. या सोबतच बंद झालेले केंद्रे पुन्हा सुरू होऊन रखडलेल्या लसीकरण मोहिमेला पुन्हा गती मिळणार आहे.

राज्यात १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यात सुरुवात झाली आहे. पुण्यातही याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १४ केंद्रांवर याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, लसीचा तुटवडा आणि मर्यादित केंद्र यामुळे नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने लस दिली जात आहे. सध्या कोव्हक्सीनचे १५ हजार डोस आल्यामुळे लसीकरणाला गती मिळण्यास मदत होईल.

चौकट

कोव्हक्सीनचे सर्व तालुक्यांना प्रत्येकी १ हजार डोस वितरित करण्यात आले. त्यामध्ये औंध जिल्हा रुग्णालयाला २ हजार लसीचे डोस आले आहेत.

चौकट

तालुकानिहाय कोव्हिशिल्ड लसीचे डोस वितरित करण्यात आले .

आंबेगाव - २८००, बारामती - ३५००, भोर - २०००, दौंड - २५००, हवेली - ४०००, इंदापूर - ३५०० जुन्नर - ३५००, खेड - ३५००, मावळ - ३०००, मुळशी - ३०००, पुरंदर - ३०००, शिरूर - ३५००, वेल्हा - ५००, पुणे कॅन्टोन्मेंट - ५००, देहू कॅन्टोन्मेंट - ५००, खडकी कॅन्टोन्मेंट - ७००