शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. अध्यक्षांनी घेतला मुख्याधिकाऱ्यांचा तास

By admin | Updated: May 6, 2016 05:41 IST

उमापसाहेब, तुम्ही या जिल्ह्याला शाश्वत विकासात एका उंचीवर घेऊन गेलात... अशी स्तुतिसुमनं उधळत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निरोप समारंभात बुधवारी आजी-माजी मुख्या

पुणे : उमापसाहेब, तुम्ही या जिल्ह्याला शाश्वत विकासात एका उंचीवर घेऊन गेलात... अशी स्तुतिसुमनं उधळत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निरोप समारंभात बुधवारी आजी-माजी मुख्याधिकाऱ्यांचा तास घेतला. निमित्त होते जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रं हाती घेतलेल्या दौलत देसाई यांच्या स्वागत समारंभ व मावळते मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांच्या निरोप समारंभाचे.सुरुवातीलाच कंद यांनी, मी खोटे बोलत नाही असे स्पष्ट करीत अधिकारी हा मावळता व उगवता असा कोणी नसतो. अधिकारी हा कायम अधिकारीच असतो, असे सांगत उमाप यांच्या कार्यकाळत झालेल्या चांगल्या गोष्टींबरोबर मी त्यांच्यातील उणिवाही दाखवून देणार हे स्पष्ट केले. आयएसओ उपक्रमामुळे जिल्हा परिषदेची प्रतिष्ठा वाढली. काही विभागात आपण चैतन्य निर्माण केलेत... बेरोजगारांना रोजगाराचा हात दिलात... असा गौरव करीत व्यसनमुक्तीसाठी हाती घेतलेले अभियान ही खरी आजची गरज आहे. तुम्ही ते हाती घेतलेत, आता देसाईसाहेब, तुम्ही जर ते प्रभावीपणे राबविले तर तुमचं नाव या जिल्हा परिषदेत आयुष्यभर राहील, कारण त्यामुळे जिल्ह्यातील काही कुटुंबांचे उद्ध्वस्त झालेले संसार सुरळीत होणार आहेत, असे सांगत त्यांच्यापुढील आवाहनही स्पष्ट केले.प्रत्येकाच्या कामाचे मूल्यमापन समाज करीत असतो. मला काही गोष्टींचे समाधान निश्चत आहे. उमापसाहेब माणूस म्हणून आपल्या इतका चांगला माणूस शोधूनही सापडणार नाही, पण दोन गोष्टी मला खटकल्या. एक म्हणजे आपल्याला वेळेचा योग्य उपयोग करता आला नाही व दुसरं म्हणजे यावर्षीचं बजेट फक्त ६0 टक्के खर्च झालं हे मोठं अपयश आहे. हे सांगत असतानाच देसाईसाहेबांपुढे कोणते आवाहन आहे हेही ते सांगायला विसरले नाहीत. पुढील बजेट हे आमचे टाईम बजेट आहे. डिसेंबरमध्येच ते पूर्ण करायचे आहे. तसे नियोजन केले आहे. याचे प्रचंड प्रेशर असणार आहे, तेव्हा आजपासूनच कामाला लागावे लागणार आहे. जिल्हा परिषदेत येणारी समस्या ही फिल्टर होऊन येते. आधी ग्रमापंचायत, नंतर पंचायत समिती व त्यानंतर जिल्हा परिषद, पण महापालिकेत साहेब तसे नाही, लोक थेट समस्या आयुक्तांच्या दालनात घेऊन येतात. तेव्हा महापालिकेत तुम्हाला गतीने निर्णय घ्यावे लागणार आहेत, ते व्हावेत ही उमाप यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करीत देसाई यांना काही सल्ले त्यांनी दिले. आपल्या दालनात सदस्यांचा खूप पाहुणचार करू नको. त्यांना चहाही पाजू नका, तो हवा असेल तर माझ्याकडे पाठवा.. पण मानसिकता चांगली ठेवून काम करा. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवा, पण कारवाईतही मागेपुढे पाहू नका. आपण बरेच दिवस परदेशात राहिला आहात. ती वाढलेली दृष्टी जिल्हा परिषदेलाही द्या. १00 टक्के गतीने काम करा पण नियमात बसून, मग ते काम अध्यक्षांचे का असेना. शेवटी अधिकारी व पदाधिकारी ही गाडीची दोन चाकं आहेत. त्यांच्या त्यांच्या भूमिकेत ती पळाली तर जिल्हा परिषदही नक्कीच पळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यानंतर उमाप यांचा तलवार भेट देवून सत्कार करण्यात आला. सत्कारला उत्तर देताना त्यांनी मी पदाधिकाऱ्यांना कामाचे सादरीकरण करण्यात कमी पडलो असे सांगितले. तसेच नूतन मुख्याधिकारी देसाई यांनी पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मी प्रयत्न करेल असे अश्वासन दिले. (वार्ताहर)आज ठरवा हो काम करायचेय!मुळशीच्या गटविकास अधिकारी या महिला असूनही त्यांनी तालुका हगणदारीमुक्त केला. तुम्ही सर्वांनी ठरवले तर जिल्हा हगणदारीमुक्त होऊ शकतो. त्यामुळे आज तुम्ही ठरवा हो ! काम करायचे आहे, असे आवाहन गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी केले.