जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसनच्या गुणवंत शिक्षिका आशा राजाराम सकट यांनी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना शाळा स्तरावर विविध नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन केले असून सामाजिक कार्यात मोठा सहभाग आहे, तसेच कोरोना काळामध्ये केलेल्या विशेष कार्याची दखल घेत त्यांना स्टेट ईनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन व महाराष्ट्र वूमन टीचर्स फोरमच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील दौंड येथील सुनिता काटम, इंदापूर येथील रुकसाना शेख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील पूनम घाटके, मुळशी येथील उज्वला कटक, दौंड जुन्नर येथील मनीषा कुऱ्हाडे तर मावळ येथील पुष्पा घोडके यांना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
आशा सकट यांना जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST