शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा जाहीर

By admin | Updated: April 2, 2017 03:05 IST

बँक आॅफ महाराष्ट्रासह जिल्ह्यातील अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्याचा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचा ४८ हजार ८०७ कोटी

पुणे : बँक आॅफ महाराष्ट्रासह जिल्ह्यातील अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्याचा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचा ४८ हजार ८०७ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचे शनिवारी प्रकाशन करण्यात आले. मागील वर्षापेक्षा तो १६ टक्क्यांनी अधिक आहे.जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार हा पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून पतपुरवठा आराखडा प्रकाशन उपजिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला बँक आॅफ महाराष्ट्रच्या पूर्व परिमंडळ विभागाचे परिमंडळ व्यवस्थापक दत्ता डोके, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी विक्रम पठारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक काशिनाथ डेकाटे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपसरव्यवस्थापक डी. एस. थोरात पाटील, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आनंद कटके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक डी. बी. देशमुख आदी उपस्थित होते.पतपुरवठा आराखड्यात लघुउद्योजकांसाठी ११ हजार ४२० कोटी रुपये, स्वयंरोजगार योजना, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, छोट्या व्यवसायासाठी १२ हजार १८५ कोटी रुपये तरतूद केली आहे. या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह ४१ बँकांच्या १ हजार ६१७ शाखांचा सहभाग आहे. गेल्या वर्षीपेक्षा एकूण पतपुरवठा आराखड्याच्या १६ टक्के वाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)